ETV Bharat / entertainment

सोनू सूदनं उघड केलं अरेस्ट वारंटमागील सत्य, पोस्ट व्हायरल - SONU SOOD ARREST WARRANT

फसवणूक प्रकरणात न्यायालयानं पाठवलेल्या अरेस्ट वारंटवर बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं आता सोशल मीडियाच्या माध्यामातून स्पष्टीकरण दिलं आहे.

Sonu Sood
सोनू सूद (सोनू सूद (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 7, 2025, 2:08 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि गरिबांचा मसीहा, सोनू सूद अलीकडेच त्याच्या अरेस्ट वारंटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आता याप्रकरणी सोनूनं आपला मौन सोडला आहे. त्यानं 7 फेब्रुवारी रोजी त्याच्या ऑफिशियल एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्यानं त्याच्या अटक वॉरंटच्या बाबी लिहिलं आहे की, 'सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरणाऱ्या बातम्या अत्यंत धक्कादायक आहेत, सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या तृतीय पक्षाशी आमचा कोणताही संबंध नाही. अशा प्रकरणात न्यायालयानं आम्हाला साक्षीदार म्हणून बोलावलं होतं. आमच्या वकिलांनी प्रतिसाद दिला आहे आणि 10 फेब्रुवारी 2025 रोजी आम्ही एक निवेदन देऊ, जे या प्रकरणात आमचा सहभाग नसल्याचं स्पष्ट करेल. मी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नाही आणि माझा कोणत्याही त्याच्याशी संबंधित नाही. हे फक्त माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी होत आहे. सेलिब्रिटींना सॉफ्ट टार्गेट बनवणे हे दुःखद आहे. आम्ही या प्रकरणात कठोर कारवाई करू.'

काय प्रकरण आहे? : लुधियाना न्यायालयानं सोनू सूदच्या नावावर समन्स आणि अटक वॉरंट जारी केले आहे. हा खटला लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या 10 लाख रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित आहे. यामध्ये त्यांनी बनावट रिजिका कॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवल्याचा दावा केला गेला आहे. यानंतर याप्रकरणी सोनू सूदला साक्ष देण्यासाठी न्यायालयात बोलावण्यात आलं होतं, मात्र तो त्या तारखेला न्यायालयात हजर झाला नाही. याप्रकरणी न्यायालयानं महाराष्ट्रातील अंधेरी पोलिसांना पत्र पाठवलं.

SONU SOOD - ARREST WARRANT
सोनू सूद - अरेस्ट वारंट (न्यायालयाचे पत्र (ईटीव्ही भारत))

काय आहे पत्रात ? : पत्रात अंधेरी पोलिसांना आदेश देण्यात आला आहे की, 'सोनू सूद, रहिवासी, घर क्रमांक 605/606 कासाब्लँक अपार्टमेंट यांना समन्स आणि वॉरंट बजावण्यात आले आहे, परंतु ते हजर राहिला नाही. तुम्हाला सोनू सूदला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.' याशिवाय प्रकरणाची पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार होणार असल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. लुधियाना न्यायालयानं सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट केलं जारी, वाचा सविस्तर
  2. 'फतेह'ची तुलना 'अ‍ॅनिमल'शी केल्यानं सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, "चित्रपटाचा अ‍ॅक्शन सीक्वेन्स..."
  3. 'फतेह'च्या कमाईची सुरुवात मंद, जाणून घ्या किती कमाई करेल...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.