हैदराबाद : उच्च-कार्यक्षमता स्मार्टफोन ब्रँड असलेल्या iQOO नं iQOO 12 साठी 4 वर्षांच्या FunTouch OS अपडेट्स आणि 5 वर्षांच्या सुरक्षा पॅचसह सॉफ्टवेअर अपडेटची घोषणा केलीय. या अपडेटसह, iQOO 12 वापरकर्तांना आता 2027 पर्यंत नवीनतम OS वैशिष्ट्यांसह आणि सुधार अपडेट मिळतील. तसेच 2028 पर्यंत वाढीव सुरक्षा पॅच मिळणार असल्याचं कंपनीनं म्हणटलं आहे. iQOO नं डिसेंबर 2023 मध्ये भारतात iQOO 12 स्मार्टफोन लाँच केला होता. हा फोन Funtouch OS 14 सह Android 14 चालतोय. त्यावेळी कंपनीनं या फोनला 3 वर्षांचे Android OS अपडेट्स आणि 4 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देण्याचं आश्वासन दिलं होतं.
आयक्यूओमध्ये, आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी अत्याधुनिक फीचर देण्याचा प्रयत्न करत आहोत. वापरकर्त्यांना अखंड अनुभव आणि दीर्घकालीन देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचं धोरण तुमच्या फोनला सुरक्षित, अद्ययावत ठेवण्यासाठी महत्वाची भूमीका बजावेल. - iQOO
सुरक्षा अपडेट्सची घोषणा
आज, iQOO कंपनीनं Android आणि सुरक्षा अपडेट्सची मुदत एक वर्षानं वाढण्याची घोषणा केलीय. आता Android आणि सुरक्षा अपडेट्स आणखी 1 वर्षानं वाढवून मिळणार आहे. त्यामुळं फोनला आता 2027 पर्यंत 4 आवृत्याचं OS अपडेट्स आणि 2028 पर्यंत 5 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या iQOO 13 ला देखील कंपनीनं अशीच सुविधा दिली होती. तथापि, हा फोन अँड्रॉइड 15 आणि फनटच ओएस 15 वर चालत असल्यानं, त्याला आयक्यूओ 12 च्या तुलनेत एक वर्ष अतिरिक्त अँड्रॉइड आणि सुरक्षा अपडेट्स मिळणार आहेत.
'हे' वाचलंत का :