हैदराबाद : जर्मन कार उत्पादक फोक्सवॅगनची नवीन एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच होणार आहे. ही ई-कार 2027 मध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे. या कारबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया या बातमीतून...
उच्च दर्जाची असणार कार
जर्मन कार उत्पादक फोक्सवॅगन त्यांची नवीन एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी करत आहे, ज्याची किंमत सुमारे 18.15 लाख रुपये असेल. या कारचं कॉन्सेप्ट मॉडेल मार्च 2025 मध्ये लोकांसमोर सादर केलं जाईल. त्यानंतर कारचं उत्पादन होणार असून ही कार 2027 मध्ये जागतिक बाजारात लाँच केली जाईल. फोक्सवॅगनचे सीईओ थॉमस शेफर यांनी कंपनीसाठी ही नवीन कार एक महत्त्वाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे. "युरोपमधील एक परवडणारी, उच्च दर्जाची आणि फायदेशीर इलेक्ट्रिक फोक्सवॅगन ही कार असेल, असं त्यांनी या गाडीचं वर्णन केलंय.
कमी किमतीत शक्तिशाली ईव्ही
फोक्सवॅगनची ही नवीन इलेक्ट्रिक कार बजेट-फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक गतिशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही ईव्ही परवडणारी किंमत, टिकाऊ आणि प्रगत इलेक्ट्रिक कारच्या शोधत असलेल्या ग्राहकांना आकर्षित करेल.
फोक्सवॅगनची नवीन इलेक्ट्रिक वाहन लाइनअप
हे नवीन मॉडेल ID. 2all शोकारची आवृत्ती असेल, जी 2026 मध्ये डीलरशिपपर्यंत पोहचेल ID. 2all ही फोक्सवॅगनची पहिली छोटी पूर्ण-इलेक्ट्रिक कार म्हणून सादर केली जाईल, ज्याची सुरुवातीची किंमत सुमारे 22.68 लाख रुपये असण्याची अपेक्षा आहे. डिझाइन MEB प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. फोक्सवॅगन ही कार त्याच्या मॉड्यूलर इलेक्ट्रिक ड्राइव्ह (MEB) प्लॅटफॉर्मवर विकसित करत आहे, ज्यामुळं ती अधिक परवडणारी आणि प्रगत तंत्रज्ञानानं सुसज्ज होईल.
ती भारतात लाँच होईल का?
सध्या, फोक्सवॅगननं भारतात लाँच करण्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, जर कंपनीनं ही ईव्ही भारतीय बाजारात लाँच केली, तर ती टाटा नेक्सन ईव्ही आणि एमजी ईव्हींसोबत स्पर्धा करेल.
हे वाचलंत का :