ETV Bharat / health-and-lifestyle

मानसिक आरोग्यासह त्वचा उजळणारे 'हे' पेय एकदा पिऊन बघा - BENEFITS OF DRINKING GREEN

ग्रीन टी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. म्हणून नियमित एक कप ग्रीन टी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात वाचा सविस्तर.

BENEFITS OF DRINKING GREEN  Green Tea For Healthy Brain  Green Tea Health Benefits  Health Benefits Of Green Tea
ग्रीन टी पिण्याचे आरोग्यदायी फायदे (Freepik)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Feb 7, 2025, 2:04 PM IST

Health Benefits Of Green Tea: ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे. ग्रीन टीमध्ये शरीर आणि त्वचेचे आरोग्य राखणारे अनेक घटक असतात. तसंच हे मेंदूचे कार्य सुधारण्यास आणि आतड्यांचं आरोग्य राखण्यास देखील मदत करते. ग्रीन टीमध्ये स्मरणशक्ती वाढवण्याची आणि अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह आजारांपासून संरक्षण करण्याची क्षमता देखील आहे. चला तर मग पाहूया नियमितपणे ग्रीन टी पिण्याचे आरोग्यदायी फायदे.

BENEFITS OF DRINKING GREEN  GREEN TEA FOR HEALTHY BRAIN  GREEN TEA HEALTH BENEFITS  HEALTH BENEFITS OF GREEN TEA
ग्रीन टी पिण्याचे आरोग्यदायी फायदे (Freepik)

अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म: ग्रीन टीमध्ये उच्च प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जर्नल ऑफ न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, हे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास आणि शरीरातील जळजळ कमी करण्यास फायदेशीर आहेत.

  • मधुमेह: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ग्रीन टी सर्वात उपयुक्त आहे. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, ग्रीन टी टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी प्रभावी आहे.
  • हृदयाचे आरोग्य: शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ग्रीन टी प्रभावी आहे. ग्रीन टी रक्तवाहिन्यांच्या एकूण कार्यात सुधारणा करण्यास देखील मदत करू शकते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. म्हणून नियमितपणे ग्रीन टी प्या.
  • कर्करोग प्रतिबंध: ग्रीन टीमध्ये उच्च प्रमाणात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यामुळे स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि कोलन कर्करोग यासारख्या विविध प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, ग्रीन टीमधील पॉलीफेनॉल कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि ट्यूमरच्या विकासाला रोखू शकतात.
  • वजन वाढणे: ग्रीन टीमधील कॅटेचिन आणि कॅफिन चरबी जाळण्यास मदत करू शकते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करू शकते. तसंच चयापचय सुधारण्यासाठी देखील ग्रीन टी फायदेशीर आहे.
  • त्वचेचे आरोग्य: त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी ग्रीन टी हा एक प्रभावी मार्ग आहे. त्यात असलेले अँटी-एजिंग गुणधर्म त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकण्यास आणि लवचिकता वाढविण्यास मदत करतात. द जर्नल ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्मेटोलॉजीमधील एका अभ्यासात असं आढळून आलं की, अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते आणि कर्करोगाचा धोका कमी करण्याची क्षमता असते.
  • तोंडाचे आरोग्य: ग्रीन टीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. यामुळे तोंडातील जंतू नष्ट होतात आणि हिरड्यांचे आजार टाळता येतो. म्हणून, तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी नियमितपणे एक किंवा दोन ग्लास ग्रीन टी पिणे चांगल आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. आठवड्यातून किती दिवस खाव्यात हिरव्या भाज्या? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात
  2. हृदविकाराचा धोका कमी करू शकता? 'या' गोष्टींकडे द्या लक्ष
  3. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आहे? या ७ पदार्थांचे सेवन करा
  4. हृदयविकार ते कर्करोगापासून बचाव करण्यासाठी 'काळी द्राक्षे' फायदेशीर
  5. रोज सकाळी 9 वाजण्यापूर्वी करा या 5 गोष्टी! शरीर होईल नैसर्गिकरित्या डिटॉक्स
  6. हे जीवनसत्त्व महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम; निरोगी राहाण्यासाठी आजच करा आहारात समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.