ETV Bharat / entertainment

रोज डेनिमित्त 'हे' गाणे समर्पित करून जोडीदाराला करा खुश... - VALENTINES DAY 2025

व्हॅलेंटाईन वीक असल्यामुळे अनेकजण आपल्या जोडीदारासाठी काहीतरी विशेष करतात, आता तुम्ही तुमचा 'रोज डे' आणखी खास बनवू शकता. पाहा ही सुंदर गाण्याची यादी...

Rose day
रोज डे (रोज डे (ETV Bharat))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 7, 2025, 1:13 PM IST

मुंबई : प्रेमाचा हंगाम सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिना सर्वांसाठी विशेष असतो. व्हॅलेंटाईन वीकचे वातावरण असल्यानं, अनेक जोडपी त्यांच्या जोडीदारांबरोबर हा आठवडा साजरा करण्याची करण्याच्या तयारीत आहे. 2025चा व्हॅलेंटाईन डे अनेक जोडप्यांसाठी खास असू शकतो. या प्रेमानं भरलेल्या आठवड्याच्या, पहिल्या दिवसाला 'रोज डे' म्हणतात. प्रेमाच्या आठवड्यात गुलाबाच्या फुलाचे विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला गुलाबाच्या थीमवर आधारित गाण्यांबद्दल सांगणार आहोत. आजच्या दिवशी तुम्ही ही गाणी तुमच्या प्रेयसी किंवा प्रियकराला समर्पित करू शकता.

'अंखियां गुलाब' (तेरी बातों में ऐसा उल्झा जिया) : 2014मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या रोमँटिक चित्रपटातील 'अंखियां गुलाब' हे गाणं रोज डेसाठी अगदी योग्य आहे. या गाण्याला मित्राजनं आवाज दिला आहे.

'फूल गुलाब का' (बीवी हो तो ऐसी) : जर तुम्हाला जुनी गाणी ऐकायला आवडत असेल तर, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला हे गाणं शेअर करून तिचा दिवस आणखी खास बनवू शकता. रेखा आणि फारुख शेख यांच्या' बीवी हो तो ऐसी' चित्रपटामधील 'फूल गुलाब का' हे गाणं खूप प्रसिद्ध आहे. या गाण्याचे बोल मनाला भिडणारे आहेत.'फूल गुलाब का' गाण्याला प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि मौहम्मद अझीझ यांनी आवाज दिला आहे.

'गुलाब' (म्युझिक व्हिडिओ) : गायक करण रंधावाचा 'गुलाब' पंजाबी गाणं हे देखील तुम्ही तुमच्या प्रेयसीला समर्पित करू शकता. या पंजाबी गाण्याबरोबर तुम्ही एक गुलाबाचं फूल जोडीदाराला भेट करून हा दिवस साजरा करू शकता. 2024 मध्ये रिलीज झालेले हे गाणं लुकास, माइकल यांनी संगीतबद्ध केलंय.

'रेड रोज' (म्युझिक व्हिडिओ) : 2024 मधील हिट हरियाणवी म्युझिक व्हिडिओ 'रेड रोज' तुमच्या व्हॅलेंटाईन डे आठवड्याची सुरुवात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. केलम सिवाच यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. हे गाणं त्यांनीच लिहिलं असून संगीतबद्ध केलंय.

'साहिबा' (म्युझिक व्हिडिओ) : 2025मधील सर्वात ट्रेंडिंग म्युझिक व्हिडिओ, 'साहिबा' तुमच्या प्रेमाच्या या दिवसासाठी सर्वोत्तम असू शकते. विजय देवरकोंडा आणि राधिका मदन यांचं रोमँटिक गाणं खूप विशेष आहे. हे गाणं म्युझिक व्हिडिओंच्या टॉप लिस्टमध्ये समाविष्ट आहे. सध्या या गाण्याचा रँक 53 आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.