मुंबई Sanjay Raut On Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर नगरीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत आहेत. कोल्हापूर नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवरुन शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावी, अशी आमची इच्छा होती, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच "गादी पुढं मोदी कोणी नाही," असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर हल्ला चढवलाय.
कोल्हापूरच्या गादीपुढे नरेंद्र मोदी कोणी नाहीत; संजय राऊतांचं पंतप्रधानांवर टीकास्त्र - Sanjay Raut - SANJAY RAUT
Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात सभा घेणार आहेत. यावरुन शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.
Published : Apr 27, 2024, 2:25 PM IST
|Updated : Apr 27, 2024, 2:45 PM IST
गादीपुढे पंतप्रधान मोदी कोणी नाहीत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका लावलाय. पंतप्रधान मोदींची आज कोल्हापूर इथं सभा पार पडतेय. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. "कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात मोदींनी तंबू ठोकलाय. लवकरच मुंबईत सात सभा घेणार आहेत, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू यांना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे, शाहू फुले आंबेडकर त्या परंपरेचा सन्मान करावा. नरेंद्र मोदी शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आले होते, हे कधी महाराष्ट्र विसरणार नाही. शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिले, जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात, हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपानं त्याठिकाणी उमेदवार जाहीर करणंच चुकीचं आहे. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं, ही आमची भूमिका होती. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती, तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली आणि भाजपा नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही. गादीपुढे मोदी कोणी नाहीत. कोल्हापूरची गादी, म्हणजे मोदींची गोदी नाही. भाजपा त्या गादीचा अपमान करत आहे. आम्हाला अपेक्षित होतं, मोदी छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात येतात, 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा त्या गादीची आहे. शिवाजी महाराजांचा सन्मान ती प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो, महाराष्ट्राची ती कुलदैवत आहे. त्यावर तुम्ही आघात करत आहात, शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधात तुम्ही प्रचाराला आला आहात," असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबत हे मोदींचं धोरण : "दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा मंबईच्या न्हावाशेवा पोर्टवरुन परदेशात जाणार आहे. गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करायचा डाव आहे. महाराष्ट्राचा कांदा सडवला जातोय, तिथं तुम्ही निर्यात बंदी केली. महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक, दूध उत्पादकांना चार पैसे मिळतात, असं कळल्यावर निर्यात बंदी करता. मात्र, गुजरातचा पांढरा कांदा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्रातला कांदा हा रस्त्यावर फेका, महाराष्ट्रातला कांदा सडवा, शेतकऱ्यांची अडवणूक करा हे मोदींचं धोरण असल्याचा घणाघात राऊत यांनी मोदींवर केलाय. शरद पवारांनी उदाहरण दिलंय. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मुलांसाठी गुजरात मधल्या अमूलनं चारा पाठविला म्हणून नरेंद्र मोदींनी गुजरातच्या अमूल संचालकांवर गुन्हा दाखल करुन खटला दाखल केला. हा मोदींचा द्वेष आहे. इथला शेतकरी तडफडत मेला पाहिजे, गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे, अशी मोदींची भूमिका आहे. ते गुजरातचे प्रधानमंत्री आहेत का," असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा :