ETV Bharat / state

छगन भुजबळ भाजपात जाण्याच्या तयारीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - MAHARASHTRA CABINET EXPANSION

काही समर्थकांनी भुजबळांना आता भाजपासोबत चला, असे जाहीरपणे आव्हान केलंय, कार्यकर्त्यांच्या आवाहनाला छगन भुजबळ कसा प्रतिसाद देतात, याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Chhagan Bhujbal is preparing to join BJP
छगन भुजबळ भाजपात जाण्याच्या तयारीत (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2024, 1:40 PM IST

Updated : Dec 19, 2024, 2:00 PM IST

नाशिकः बहुमताने राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकडून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलंनाही. छगन भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. काही समर्थकांनी आता भाजपासोबत चला, असे जाहीरपणे आवाहन केलंय, कार्यकर्त्यांच्या आवाहनाला छगन भुजबळ कसा प्रतिसाद देतात, याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नेत्यांशी बोलून पुढील राजकीय वाटचाल ठरवणार : "मैं उस पुराने जमाने का सिक्का हु, मुझे फेंक ना देना", अशा प्रकारे शेरोशायरी करत छगन भुजबळांनी समता परिषदेच्या मेळाव्यात 40 मिनिटे धडाकेबाज भाषण केलंय, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना लक्ष केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा माझा मंत्रिमंडळात समावेश असावा, असा आग्रह होता. मात्र आमच्या नेत्याने ऐकलं नाही, असं त्यांनी म्हटलंय. या बैठकीला राज्याच्या विविध भागातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आले होते. यावेळी काही समर्थकांनी आता भाजपासोबत चला, असे जाहीरपणे आवाहन केलंय, तर काहींनी नवीन पक्ष काढण्याच्या मनोदय व्यक्त केलाय, मात्र तूर्तास सध्या कुठेही जायचे नाही. राज्यभरातील समता परिषदेचे पदाधिकारी आणि नेत्यांशी बोलून पुढील राजकीय वाटचाल ठरवणार असल्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिलेत.

...तर भुजबळांचा भाजपाला फायदा होऊ शकतो : मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टोकाची टीका केली होती, तेव्हा भाजपाच्या इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जरांगेंना प्रत्युत्तर देण्यात छगन भुजबळ आघाडीवर होते. छगन भुजबळांसारखा ओबीसीचा एक मोठा नेता भाजपात आल्याने भाजपाची पकड मजबूत होईल. तसेच लवकर बिहारची विधानसभा निवडणूक आहे, तेथील ओबीसी मतदारांमध्ये भुजबळ यांना बऱ्यापैकी मान्यता आहे, त्याचाही फायदा भाजपाला होऊ शकतो, असं काही भाजपा नेत्यांना वाटतं. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी गृहमंत्री अमित शाह यांनी भुजबळ यांनी नाशिकमधून निवडणूक लढवावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, त्यामुळे दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेते भुजबळांबाबत अनुकूल असल्याचे दिसून येते.

...म्हणून अजित पवारांनी दिला भुजबळांचा बळी : ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आहे. अशातच मराठा आरक्षणावेळी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका भुजबळांनी घेतली होती. त्यामुळे त्यांना मराठा समाजाचा रोष पत्करावा लागला होता, याचा फटका भुजबळांना येवल्यातसुद्धा बसला. स्वतः भुजबळांनी माझं मताधिक्य कमी झाल्याची कबुली दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मराठा आमदारांचादेखील भुजबळ मंत्रिमंडळात असावे, यासाठी अप्रत्यक्ष विरोध होता. सिन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्री करण्याचा दिलेला शब्द खरा करण्यासाठी अजित पवारांनी छगन भुजबळ यांचा बळी दिला, असं राजकीय विश्लेषक हेमंत भोसले यांनी म्हटलंय.

भुजबळ साहेबांनी आता भाजपात जायला हवं : गेल्या 40 वर्षांपासून छगन भुजबळ साहेबांनी ओबीसी, दलित, वंचित घटकांसाठी योगदान दिलंय. आम्ही भुजबळ साहेबांवरील अन्याय सहन करणार नाही. महाराष्ट्राला छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाची गरज असून, त्यांच्या सहभागाशिवाय सरकार चालू शकणार नाही. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मंत्रिमंडळात त्यांचं स्थान असणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांना सन्मानाने मंत्रिपद देण्यात यावे. जिथे आपला सन्मान राखला जाईल, तिथेच आपण काम करायला हवं. भुजबळ साहेबांनी आता भाजपात जायला हवं, त्या निर्णयाशी आम्ही एकमताने सोबत आहोत, अशा भावना यावेळी पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यात.

हेही वाचा-

विधानसभा हिवाळी अधिवेशन 2024 : संघाच्या शाखेतून माझी सुरुवात, मग शिवसेनेत आलो; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

अजित पवार यांची बौद्धिकला दांडी; एकनाथ शिंदे यांनी लावली हजेरी - RSS BAUDHIK NAGPUR

Last Updated : Dec 19, 2024, 2:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.