अमित शाह यांच्या वक्तव्याचे पडसाद; विधानभवन परिसरात 'मविआ' अन् 'महायुती'चं आंदोलन, पाहा व्हिडिओ - MVA VS MAHAYUTI PROTEST
🎬 Watch Now: Feature Video
Published : 3 hours ago
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज (19 डिसेंबर) नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षांनी आज नागपूरमधील संविधान चौकात तसंच विधानभवन परिसरात अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. तर महाविकास आघाडीच्या आंदोलनाला विरोध म्हणून शिवसेना आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. "भारतीय राजकारण काँग्रेसनं नासवलंय. हरीजनांचे नाव घेऊन बाबासाहेबांना फसवलंय", असा आरोप यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केला. तसंच दलित आणि अस्पृश्यांना विशेष प्रतिनिधित्व काँग्रेसनं नाकारलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना काँग्रेसनं कायम झिडकारलं, अशा आशयाचे बॅनर शिवसेना आमदारांच्या हातात बघायला मिळाले.