लंडन England Lions Cricket Team : इंग्लंड लायन्स क्रिकेट संघाला जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचं आहे. हा दौरा 14 जानेवारी 2025 पासून सुरु होईल. या दौऱ्यासाठी इंग्लंड लायन्स संघात 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या दौऱ्यात, इंग्लंड लायन्स संघ ब्रिस्बेन इथं क्रिकेट ऑस्ट्रेलिया 11 विरुद्ध दोन चार दिवसीय सामने आणि त्यानंतर सिडनी इथं ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध प्रथम श्रेणी कसोटी सामना खेळेल. या दौऱ्यासाठी इंग्लंड लायन्स संघ 3 जानेवारीला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
वडिलांनी आपल्याच मुलाला दिलं संघात स्थान : या दौऱ्यासाठी रॉकी फ्लिंटॉफचाही इंग्लंड लायन्स संघात समावेश करण्यात आला आहे. रॉकी फ्लिंटॉफ हा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा आहे. विशेष म्हणजे इंग्लंड लायन्सचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू फ्लिंटॉफ आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी इंग्लंड लायन्स संघात 16 वर्षीय रॉकी फ्लिंटॉफचाही समावेश करण्यात आला होता. जरी तो काही विशेष कामगिरी करु शकला नाही. यावेळी रॉकीला शेवटच्या क्षणी संघात स्थान मिळालं.
✅ Sam Cook
— England Cricket (@englandcricket) December 18, 2024
✅ Shoaib Bashir
✅ Rocky Flintoff
We've confirmed our 16-player squad for the upcoming Lions tour of Australia 👇
काय म्हणाले डायरेक्टर : शोएब बशीर, पॅट ब्राउन, टॉम हार्टले, जोश टंग आणि जॉन टर्नर यांचाही इंग्लंड लायन्स संघात समावेश करण्यात आला आहे, ते वरिष्ठ संघाचा देखील भाग आहेत. इंग्लंडचे परफॉर्मन्स डायरेक्टर एड बार्नी म्हणाले, 'आम्ही अशा खेळाडूंची निवड केली आहे ज्यांनी या स्तरावर स्वतःला सिद्ध केलं आहे आणि ज्यांच्याकडं लक्षणीय क्षमता आहे. ऑस्ट्रेलियाचे सामने आणि दौरे हे नेहमीच महत्त्वाचे असतात आणि दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आत्मपरीक्षण करण्याची संधी आम्हाला मिळते.'
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी इंग्लंड लायन्सचा संघ :
सोनी बेकर, शोएब बशीर, पॅट ब्राउन, जेम्स कोल्स, सॅम कुक, ॲलेक्स डेव्हिस, रॉकी फ्लिंटॉफ, टॉम हार्टले, टॉम लॉज, फ्रेडी मॅककॅन, बेन मॅककिन्नी, जेम्स रेव्ह, हमजा शेख, मिच स्टॅनली, जोश टंग, जॉन टर्नर.
हेही वाचा :