मुंबई - 'नवरी मिळे हिटलरला' हा शो अनेकांना आवडतो. या मालिकेतील पात्रांना खूप लोकप्रिता मिळत आहे. 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतील एजे आणि लीला ही पात्रेदेखील लोकप्रिय झाली आहेत. एजे आणि लीला या दोघांचे व्यक्तिमत्त्व, वेगळे गुण असल्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका विशेष वाटते. या मालिकेमध्ये एजेची भूमिका अभिनेता राकेश बापटनं साकरली आहे. याशिवाय लीलाची भूमिका ही वल्लरी विराजनं केली आहे. अनेकदा दोघेही सेटवरचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. आता या दोघांचा सेटवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
राकेश बापटनं सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ : आता चाहत्यांना देखील या दोन्ही स्टार्सचा व्हिडिओ खूप पसंत पडला आहे. या दोघांच्या या व्हिडिओवर अनेक चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओत राकेश बापट आणि वल्लरी विराजबरोबर बाईकवर बसले असून गोड हसताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा आहे. याशिवाय हा व्हिडिओ राकेश बापटनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात त्यानं सहकलाकार वल्लरी विराजला टॅग केलंय. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीत 'ओ माही' हे गाणं वाजत आहे.
चाहत्यांना आवडला राकेश बापटचा व्हिडिओ : राकेश बापटनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, 'लीला आणि एजेची बेस्ट जोडी आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'खूप सुंदर व्हिडिओ आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'लीला ही सारखी स्वप्न पाहत असते.' याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत सध्या लीलाकडे संपूर्ण घराची जबाबदारी आली आहे. घराची जबाबदारी सांभाळताना तिच्याकडून खूप चुका देखील होत आहे. मात्र, एजे आणि आजी तिला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत लीला एजेला सरप्राईज देणार असल्याचं दिसत आहे. मात्र हे सरप्राईज पाहून एजेला त्याची पहिली पत्नीची अंतराची आठवण येते. यानंतर तो रागानं ओरडताना दिसतो. आता पुढं काय होणार हे काही वेळात समजेल.