हैदराबाद Kia Syros : भारतीय बाजारपेठेत अनेक विभागांमध्ये सर्वोत्तम वाहने देणाऱ्या दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी किआनं एक नवीन एसयूव्ही सादर केली आहे. वाहन उत्पादक कंपनी किआने भारतीय बाजारात सायरोस सादर केले आहे. कंपनीने त्यात काही सर्वोत्तम वैशिष्ट्ये दिली आहेत. तसेच, तिची रचना देखील विद्यमान एसयूव्हींपेक्षा वेगळी आहे.
The SUV revolution starts here.
— Kia India (@KiaInd) December 19, 2024
Introducing the all-new Kia Syros–A new species of SUV, evolved by the future.
Witness the evolution at https://t.co/Xf5sJcpqs5 or YouTube @KiaInd#KiaIndia #TheKiaSyros #TheNextFromKia #MovementThatInspires https://t.co/ay8Cx8UfIH
काय आहे खास : नवीन एसयूव्ही कंपनीनं खूप प्रशस्त बनवली आहे. त्यात रिक्लाइनिंग रिअर सीट आहे. याशिवाय, कंपनीनं या एसयूव्हीचं नाव ग्रीक बेटाच्या नावावर ठेवलं आहे.
Kia Syros एसयूव्ही फीचर्स : कंपनीनं किआ या एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. त्यात एलईडी लाईट्स, एलईडी डीआरएल, पॅनोरॅमिक सनरूफ, एलईडी टेल लाईट्स, अँबियंट लाईट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, टेरेन आणि ड्रायव्हिंग मोड्स, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, लेव्हल-2 एडीएएस, सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
किती शक्तिशाली इंजिन : कंपनीनं किआ सायरोस एसयूव्हीमध्ये 1 लिटर क्षमतेचं टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम इंजिन दिलं आहे. जे 100 ओमची पॉवर आणि 100 न्यूटन मीटरचा टॉर्क देतं. ते 6-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्पीड डीसीटी ट्रान्समिशनसह आणलं आहे.
बुकिंग कधी सुरू होईल : एसयूव्हीची बुकिंग 3 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. कारची डिलिव्हरी फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल.
किती असेल किंमत? : कंपनीकडून लॉंचवेळीच एसयूव्हीची किंमत समोर येइल. परंतु अशी अपेक्षा आहे की Syros SUV Kia 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉंच होऊ शकते. याबाबत कंपनीनं अधिकृत माहिती दिलेली नाहीय. तसंच लॉंच बाबतही कंपनीनं माहिती दिलेली नाहीय.
कोणाशी करणार स्पर्धा : किआनं भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सिरोस एसयूव्ही आणली आहे. या विभागात, ती टाटा, मारुती, ह्युंदाई सारख्या कंपन्यांच्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करेल.
हे वाचलंत का :