हैदराबाद - बुधवारी अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी संध्या थिएटर घटनेत जखमी झालेल्या मुलाची भेट घेण्यासाठी हैदराबादच्या रुग्णालयाला भेट दिली. 4 डिसेंबरपासून रुग्णालयात दाखल असलेल्या या मुलाची प्रकृती जाणून घेण्यासाठी तेलंगणा राज्याचे आरोग्य सचिव क्रिस्टीना झेड चोंगथू आणि हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. आनंदही त्यांच्याबरोबर गेले होते.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान घडलेल्या घटनेत मुलाने आपली आई गमावली होती आणि त्यालाही गंभीर दुखापत झाली होती. प्रसिद्ध पीआर एलुरु श्रीनू यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अल्लू अरविंद हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना दिसत आहेत.
Producer Allu Aravind garu visited Sri Tej at the hospital after obtaining all necessary permissions from the government and police authorities.
— Eluru Sreenu (@IamEluruSreenu) December 18, 2024
He stated that Sri Tej has shown considerable improvement over the past 10 days. He also noted that, due to legal restrictions… pic.twitter.com/8pPSxkOI1r
"गेल्या 14 दिवसांपासून जखमी मुलावर उपचार सुरू असून गेल्या 10 दिवसात त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पंरतु त्याला पूर्ण बरं वाटण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आम्ही मुलासाठी आवश्यक ते सर्व करण्यास तयार आहोत. ...,"असं अल्लू अरविंद यांनी सांगितलं. एलुरु श्रीनू यांच्या म्हण्यानुसार, अल्लू अरविंद यांनी असेही नमूद केलं की, "चालू असलेल्या खटल्याशी संबंधित कायदेशीर निर्बंधांमुळे, अल्लू अर्जुन सध्या त्या जखमी मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला भेटू शकत नाही.," असं अल्लू अरविंद यांनी म्हटलंय.
गेल्या आठवड्यात अल्लू अर्जुनला त्याच्या रिलीज झालेल्या पुष्पा चित्रपटाच्या रिलीज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी सकाळी त्यांची सुटका करण्यात आली.
तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुननं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि त्याला पाठिंबा दर्शवणाऱ्या सर्वांचं आभार मानलं होतं. हा एक दुर्दैवी अपघात असल्याचं तो म्हणाला होता. आपण काद्याचं पालन करणारा व्यक्ती असून सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी तयार असल्याचं तो म्हणाला होता. पीडितेच्या कुटुंबाबद्द अत्यंत दुःख व्यक्त करुन वैयक्तिकरित्या सर्वप्रकारची मदत करण्याची तयारी त्यानं दाखवली होती.
आपल्या कुटुंबासह चित्रपट पाहत असताना चित्रपटगृहाबाहेर घडलेल्या या दुःखद घटनेत आपला थेट सहभाग नसल्याचं अल्लू अर्जुननं स्पष्ट केलं होतं. "हे निव्वळ आकस्मिक आणि अनावधानानं घडलं होतं... मी गेल्या 20 वर्षांपासून एकाच थिएटरमध्ये जात आहे आणि मी 30 पेक्षा जास्त वेळा या एकाच ठिकाणी गेलो आहे. याआधी कधीही असा अपघात झालेला नाही. मी यावर आता काही जास्त बोलू शकणार नाही," असं तो पुढं म्हणाला होता.