ETV Bharat / entertainment

अरमान मलिकनं 'बुट्टा बोम्मा' गाणं गाऊन एड शीरनच्या कॉन्सर्टची केली सुरुवात, रामोजी फिल्म सिटीमध्ये झाला धमाका... - ED SHEERAN

गायक अरमान मलिकनं 'बुट्टा बोम्मा' गाणं गाऊन जागतिक पॉप स्टार एड शीरनच्या कॉन्सर्टची सुरुवात केली. आता काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

ed sheeran
एड शीरन (एड शीरन आणि अरमान मलिक (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 3, 2025, 10:58 AM IST

मुंबई : ग्लोबल सिंगर एड शीरननं काल रात्री 2 फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये धमाकेदार परफॉर्मेंस दिला. याशिवाय या कार्यक्रमामध्ये बॉलिवूड पार्श्वगायक अरमान मलिकनं देखील त्यांच्या सुंदर आवाजानं चाहत्यांचं मनं जिंकली. एड शीरन-अरमान मलिक यांचा हा दुसरा सहयोग आहे. दोन्ही गायकांनी यापूर्वी 2022मध्ये मुंबईत एक स्टेज शेअर केला होता. रामोजी फिल्म सिटीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिल्यानंतर, अरमान मलिकनं त्याच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. दरम्यान त्यानं व्हिडिओच्या पोस्टमध्ये कॅप्शन दिलं, 'हैदराबादमध्ये 'बुट्टा बोम्मा'चा परफॉर्मन्स नेहमीच 'परफेक्ट' असतो.' तसेच बुक माय शोनं देखील इंस्टाग्राम अकाउंटवर दोन्ही दिग्गजांच्या खास स्टेज परफॉर्मन्सचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावर त्यांनी कॅप्शन दिलं, '2 दिग्गज, एक स्टेज. '2स्टेप'नं आपल्या सर्वांची मनं जिंकली.'

एड शीरनचा कॉन्सर्ट : एड शीरननं 'डार्क इन द स्काय', ' 2 स्टेजेस टुगेदर' अशी अनेक गाणी सादर केली आहे. एड शीरन आणि अरमान मलिक यांच्या या सहकार्यानं संगीत प्रेमींना एक खास भेट मिळाली आहे. याशिवाय अनेकजण देखील या शोचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. संगीत कार्यक्रमापूर्वी एड आणि अरमाननं हैदराबाद शहराला भेट दिली. संगीत कार्यक्रमाच्या काही तास आधी, एड शीरननं थोडा वेळ काढून हैदराबाद शहराला भेट दिली. या प्रवासात अरमान त्याचा मार्गदर्शक बनला होता. रविवारी दुपारी एड आणि अरमान यांनी फलकनुमा पॅलेस आणि चारमिनारला भेट दिली. दोन्ही दिग्गजांनी त्यांच्या हैदराबाद दौऱ्यामधील काही व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

एड शीरननं ऑटो रिक्षाची केली सवारी : हैदराबाद दौऱ्यातील फोटोत एड शीरन आणि अरमान मलिक हे दोन्ही स्टार्स खूप मजा करताना दिसत आहेत. या दोन्ही संगीतकारांनी मोत्यांच्या शहरात पुरेपूर आनंद घेतला. तसेच एड शीरननं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत अरमान मलिकचे आभार मानले आहेत. याशिवाय त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये तो ऑटो रिक्षामध्ये प्रवास करताना दिसत आहे. व्हिडिओत त्याचा कॅमेरामॅन त्याचे काही आकर्षक क्षण शूट करताना देखील दिसत आहे.

हेही वाचा :

  1. रामोजी फिल्म सिटीमध्ये एड शीरन अरमान मलिकबरोबर करणार धमाल, संपूर्ण माहिती जाणून घ्या...
  2. रामोजी फिल्म सिटीत होणार एड शीरनचा कॉन्सर्ट, भारतात या शहरात होणार कार्यक्रम
  3. Ed Sheeran : ग्लोबल सिंगर एड शिरीन कॉन्सर्टनंतर मुंबई विमानतळावर झाला स्पॉट ; व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.