ETV Bharat / sports

रोहित शर्मा, विराट कोहलीसह दिग्गज खेळाडू नागपुरात दाखल; कधी करणार सराव? - TEAM INDIA IN NAGPUR

भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या जामठा मैदानावर 6 फेब्रुवारी खेळला जाणार आहे.

Team India in Nagpur
रोहित शर्मा, विराट कोहलीसह दिग्गज खेळाडू नागपुरात दाखल (Social Media X)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 3, 2025, 1:30 PM IST

नागपूर Team India in Nagpur : भारतीय क्रिकेट संघानं T20 मालिकेत इंग्लंडला पराभवाची धूळ चारत पाच सामन्यांची मालिका 4-1 च्या मोठया फरकानं खिशात घातलीय. T20 मालिकेनंतर आता भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या जमठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर 6 फेब्रुवारी खेळला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघ आज संध्याकाळी नागपूरात दाखल होणार आहेत. मात्र, रविवारी रात्री उशिरा भारतीय क्रिकेट संघातील 5 खेळाडू नागपुरात दाखल झाले आहेत. यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शुभम गिल, यशस्वी जायसवाल व रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे तर उर्वरित खेळाडू हे आज नागपूर येणार आहेत. भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू नागपूरात दाखल झाल्यानं त्यांचे फॅन्स मात्र उत्साही झाले आहेत.

आज करणार खेळाडू सराव : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना नागपूरच्या जामठा मैदानावर 6 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. त्यासाठी आधी नागपुरात दाखल झालेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शुभम गिल, यशस्वी जायसवाल आणि रवींद्र जडेजा हे आज दुपारच्या दरम्यान सराव करणार आहेत. तसंच आज संध्याकाळी भारतीय संघ आणि इंग्लंडचा संघ नागपूरत दाखल होणार आहे. त्यानंतर उद्या दोन्ही संघ जामठा येथील व्हीसीएच्या मैदानावर सत्रात सराव करणार आहेत. 19 फेब्रुवारीला सुरु होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.

टीम इंडियानं जिंकली T20 मालिका : जर आपण या इंग्लंड मालिकेबद्दल बोललो तर टीम इंडियानं जवळजवळ प्रत्येक सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. भारतीय संघानं फक्त एकच सामना गमावला आणि उर्वरित सर्व सामने जिंकण्यात यश मिळवलं. पहिले दोन सामने जिंकून भारतानं आपले इरादे स्पष्ट केले होते. पण इंग्लंडनं तिसऱ्या सामन्यात पुनरागमन केलं आणि सामना जिंकला, पण एका सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघानं पुन्हा एकदा पुनरागमन केलं आणि चौथा सामना जिंकून मालिका जिंकली. शेवटचा सामना जिंकल्यानंतरही टीम इंडियानं आपला झेंडा उंच ठेवला आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल.

हेही वाचा :

  1. इंग्रजांना पराभूत करताच भारतानं केली जपानची बरोबरी; कॅनेडला टाकलं मागे
  2. भारतानं इंग्लंडला नमवलं; अभिषेक शर्मा, शमीच्या खेळीच्या जोरावर मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताचा दमदार विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.