मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आता चर्चेत आला आहे. अलीकडेच मुंबईतील रस्त्यावर फिरणाऱ्या आदि मानवच्या वेशात एका माणसाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आदि मावानच्या वेशात फिरणारा हा माणूस आमिर खान असल्याचं सांगितलं जात होतं. आता या आदि मानवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आमिर खान आदि मानवाच्या गेटअपमध्ये तयार होत होता. यानंतर असं मानलं जात होतं की, व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती आमिर खान आहे, मात्र आता या व्हिडिओचे सत्य बाहेर आलं आहे.
आमिर खान आदि मानवच्या वेशात मुंबईच्या रस्त्यावर दिसला ? : रिपोर्ट्सवर आदि मानवच्या वेशात फिरणारा माणूस आमिर खान नसून दुसरा कोणीतरी आहे. आमिर खानच्या टीमनं असं म्हटलं आहे की, 'ती व्यक्ती आमिर खान नाही. अशा कोणत्याही अफवा पसरवू नका, या सर्व बातम्या खोट्या आहेत, ही फक्त एक अफवा आहे आणि त्यात कोणतेही तथ्य नाही.' हा व्हिडिओ गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आदि मानवच्या वेशात रस्त्यावर विचित्र गोष्टी करताना दिसत आहे. तसेच आमिर खानचा प्रिमिटिव्ह लूकमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर या अफवा पसरू लागल्या होत्या. आमिरनं एका जाहिरातीसाठी प्रिमिटिव्ह गेटअप केला होता.
\Amir Khan as a caveman on Mumbai streets.. pic.twitter.com/jcgyY8rdeG
— Mumbai Bhidu (@MumbaiBhidu) February 1, 2025
आमिर खानचं वर्कफ्रंट : आमिर खान गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटात तो करीना कपूर खानबरोबर मोठ्या पडद्यावर दिसला होता. आमिर खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि त्यानंतर त्यानं अभिनेता म्हणून चित्रपटांपासून स्वतःला दूर केलं. आमिर खान सनी देओलबरोबर 'लाहोर 1947' या चित्रपटासाठी काम करणार आहे. याशिवाय तो 'सितारे जमीन पर'मध्ये अभिनेत्री जेनेलिया डिसूझाबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाच्या अपडेटबद्दल अनेकजण वाट पाहात आहेत.
हेही वाचा :