ETV Bharat / politics

भाजपाचं मिशन महापौर, ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना दिला पक्षप्रवेश - THACKERAY GROUP LEADERS JOIN BJP

विधानसभा निवडणूक झाल्यावर लगेच भाजपा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आता भाजपानं 'मिशन महापौर'ची तयारी सुरू केली आहे.

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2025, 5:24 PM IST

छत्रपती संभाजीनगर : भाजपा तर्फे मिशन महापौर राबवण्यात येत आहे. त्यासाठी जागोजागी सदस्य नोंदणी मोहीम सोबतच इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी रणनीती आखली जात आहे. कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं हे पाऊल उचललं जात आहे. या माध्यमातून आगामी काळात स्वबळावर लढण्यासाठी तयारी करत असल्याचं बोललं जातय. यावर रवींद्र चव्हाण यांनी मात्र बोलणं टाळलं.

ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत पूर्ण ताकदीनं उतरण्यासाठी भाजपा तयारी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेकांचे पक्ष प्रवेश केले जात आहेत. विशेषतः ठाकरेंचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रवेशासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी (3 फेब्रुवारी) रोजी उस्मानपुरा येथील भाजपा कार्यालयात मोठा पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला. पक्षाचे नवनियुक्त संघटन प्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात जाहीर प्रवेश दिला. मागील महिन्यात ठाकरेंच्या पक्षातील माजी नगरसेवकांना शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी पक्षाच्या नेत्यांच्या हस्ते प्रवेश दिला होता. त्यानंतर आज पुन्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपल्याकडं ओढत ठाकरेंच्या शिवसेनेला दणका देण्याचा प्रयत्न भाजपातर्फे करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया देताना भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण (ETV Bharat Reporter)

शहरात भाजपाची बैठक : 1 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत आमचं राज्यभर अभियान सुरू आहे. तर दीड कोटी सदस्य संख्या करण्याचं आमचं ध्येय असल्याचं सांगत रवींद्र चव्हाण यांनी पुढे बोलणं टाळलं. मात्र एका खासगी हॉटेलमध्ये पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक त्यांनी घेतली. त्यात महानगर पालिका निवडणुकीत मिशन महापौरबाबत रणनीती तयार केली जात आहे. त्यामुळं आगामी काळात बैठकांचं सत्र वाढेल हे नक्की आहे, असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. भाजपाचं मिशन महापौर: स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पदाधिकाऱ्यांचा पक्षाकडं आग्रह, शिवसेनाही तयार, पण . . .
  2. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का: माजी महापौर दाम्पत्य एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत, आगामी निवडणुकीचं उबाठापुढं आव्हान
  3. Man of the Moment : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, जाणून घ्या राजकीय कारकीर्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.