ठाणे : प्रेम प्रकरणातून आणि पैशाच्या व्यवहारातून अंबरनाथच्या ब्रीजवर एका 35 वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. ते पैसे परत कर नाहीतर माझ्याशी लग्न कर असा तगादा तिनं लावल्यानंतर आरोपीने तिची हत्या केली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी तरूणाला अटक केल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली.
पैसे दे नाहीतर लग्न कर...: मृत महिला आणि आरोपी तरूण यांचे प्रेमसंबंध होते. मृत महिला ही 35 वर्षांची होती तर आरोपी तरूण हा 29 वर्षांचा आहे. महिलेने आरोपी तरूणाला हात उसने पैसे दिले होते. त्यानंतर तिने हात उसने पैसे दे नाहीतर माझ्याशी लग्न कर असा तगादा आरोपीच्या मागे लावला होता.अशी माहिती पोलिसांनी दिली.
काय प्रकरण? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही पतीपासून विभक्त राहत होती. ती अंबरनाथ शहरातील एका चाळीत आपल्या १४ वर्षाच्या मुलीसोबत राहत होती. ती बेबी सेंटींगच काम करून आपली उपजीविका चालवत होती. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या आरोपी तरूणासोबत तिचं प्रेमाचं सूत जुळलं. त्यातच मृत महिलेने आरोपी तरूणाला अडीच लाख रूपये उसनवारीवर दिले होते. हेच उसनवारीन दिलेले पैसे परत मगण्यासाठी महिलेने तरूणाकडं तगादा लावला होता. पैसे परत दे नाही तर माझ्याशी लग्न कर असं ती म्हणत होती. मात्र, आरोपी तरूण तिच्या या मागणीकडं दुर्लक्ष करत असल्यानं अखेर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते अशी धमकी महिलेने तरूणाला दिली होती. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली.
धारधार शस्त्राने केला हल्ला : दरम्यान सोमवारी अंबरनाथ रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या ब्रीजवर या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने महिलेवर धारधार शस्त्राने हल्ला केला आणि तिची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनस्थळी दाखल झाले. पंचनामा करत आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा -