World Cancer Day 2025: दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिवस साजारा करण्यात येतो. कॅन्सरसंबंधित उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंत कॅन्सरबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशानं हा दिवस साजर केला जातो. दरवर्षी अनेक लोक कॅन्सरने जीव गमावतात. यामुळे कॅन्सर या रोगाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार देशात कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये 12 ते 18 टक्के वाढ होवू शकते. यामुळे दरवर्षी या दिवशी कॅन्सरची लक्षणं, त्यावरील उपाय तसंच कॅन्सरविषयी जनजागृती केली जाते. चला तर जाणून घेऊया जागतिक कॅन्सर दिवसाचा इतिहास, थीम आणि बचावाचे उपाय.
- कॅन्सर दिनाचा इतिहास
सन 1999 च्या पॅरिसमधील कॅन्सरविरुद्धच्या जागतिक शिखर परिषदेत कॅन्सर दिवस साजरा करण्याच्या प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर 4 फेब्रुवारी 2000 मध्ये फ्रान्समधील वर्ड कॅन्स काऊन्सिल फॉर द न्यू मिलेनियम येथे कर्करोगाची परिषद झाली. यावेळी युनेस्कोचे तत्कालीन महासंचालक कोइचिरो मत्सुरा आणि फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष जॅक शिरार यांनी कॅन्सर दिवस साजरा करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. तेंव्हापासून दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस साजरा केला जातो.
- यंदाची थीम: दरवर्षी वेगवेगळ्या थीमनुसार जागतिक कर्करोग दिवस साजरा केला जातो. 'यूनाइटेड बाय यूनीक' ही यावर्षीची थीम आहे.
- 2.3 दशलक्ष महिलांना स्तनाचा कर्करोग: स्तनाचा कर्करोग हा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 2022 मध्ये, 2.3 दशलक्ष महिलांना स्तनाच्या कर्करोग असल्याचं निदान झालंय. तसंच जगभरात 6 लाख 70 लोकांचा मृत्यू कर्करोगानं झालाय.
- कर्करोग टाळण्यासाठी हे करा
- तंबाखू टाळा
- वजन नियंत्रित ठेवा.
- जीवनशैली बदला
- स्वस्थ आहार घ्या.
- नियमित व्यायाम करा.
- सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी सनस्कीन किवा सावलीत राहा.
- ह्यूमन पेपिलोमाव्हायरस किवा हिपेटायटिस-बीचं लसीकरण करून घ्या.
- तणाव ग्रस्त राहू नका.
- प्रक्रिया केलेलं मांस खाणं टाळा.
- लाल मांस खाणं टाळा कारण यामुळे यकृत आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्याता 20 ते 60% वाढते.
- स्क्रीन टाईम कमी करा कारण यामुळे झोपेत व्यत्यय निर्माण होतो परिणामी स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/18076281/
https://www.frontiersin.org/journals/physiology/articles/10.3389/fphys.2022.943108/full