मुंबई : बॉलिवूडची 'देसी गर्ल' सध्या भारतात आली आहे. प्रियांका चोप्रा राजामौली आणि महेश बाबू यांच्या 'एसएसएमबी 29' ('SSMB29') या चित्रपटासाठी काम करणार आहे. प्रियांका चोप्रा बऱ्याच काळानंतर भारतीय चित्रपटसृष्टीत परतली आहे. अमेरिकेत गेल्यानंतर, 'देसी गर्ल'चे चाहते तिला बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. आता प्रियांका रुपेरी पडद्यावर धमाल करण्यास सज्ज आहे. 'देसी गर्ल'नं अनेक हॉलिवूड प्रोजक्ट्साठी काम केलं आहे. सध्या प्रियांका चोप्रा तिच्या भावाच्या लग्नाबाबतही चर्चेत आहे. प्रियांका चोप्राबद्दल असं म्हटलं जात आहे की, तिनं तिच्या भावाच्या लग्नासाठी अभिनयातून ब्रेक घेतला आहे.
प्रियांका चोप्रा तिच्या भावाच्या लग्नासाठी भारतात : सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या खाजगी विमानतळावरील प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये 'देसी गर्ल' एका छान कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत ती पूर्णपणे पांढऱ्या रंगाच्या पोशाख दिसत आहे. या लूकला आणखी विशेष बनविण्यासाठी तिनं सनग्लासेस लावला आहेत. तसेच व्हिडिओत प्रियांकानं विमानतळावर पापाराझींसाठी खूप पोझ दिल्या. प्रियांका आता भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नाला उपस्थित असणार आहे.
प्रियांकाच्या भावाचं लग्न : सिद्धार्थनं 2024 मध्ये नीलम उपाध्यायबरोबर साखरपूडा केला होता. या कार्यक्रमात 'देसी गर्ल' उपस्थित होती. तसेच सिद्धार्थबद्दल बोलायचं झालं तर तो एक चित्रपट निर्माता आहे आणि त्याच्या कंपनीचे नाव पर्पल पेबल पिक्चर्स आहे. याशिवाय नीलम ही एक साऊथ अभिनेत्री आहे. तिनं काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता 'देसी गर्ल'चे चाहते सिद्धार्थ कधी लग्न करणार याची वाट पाहत आहेत. अलीकडेच प्रियांका चोप्रानं तिच्या सुरुवातीच्या चित्रपट कारकिर्दीत झालेल्या कास्टिंग काउचबद्दल एक धक्कादायक खुलासा केला होता. दरम्यान प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी हिंदी चित्रपट 'द स्काई ऑफ पिंक'मध्ये फरहान अख्तरबरोबर दिसली होती. याशिवाय ती राजामौली आणि महेश बाबूबरोबर 'एसएसएमबी 29'ची तयारी करत आहे. तसेच तिचे हॉलिवूडमधील आगामी चित्रपट 'द ब्लफ', 'हेड्स ऑफ स्टेट्स' आणि 'सिटाडेल सीझन 2' हे आहेत.
हेही वाचा :