हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) NVS 02 नेव्हिगेशन उपग्रह इच्छित कक्षेत स्थापित करण्यात मोठा अडथळा आलाय. रविवारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, उपग्रहाचं थ्रस्टर्स योग्यरित्या काम न करू शकल्यामुळं अडथळा आलाय."यावेळी थ्रस्टर्सना आग लावण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिडायझर इनटेक व्हॉल्व्ह उघडलं नसल्यानं, डिझाइन केलेल्या ऑर्बिटल स्लॉटमध्ये उपग्रह इच्छित कक्षेत ठेवण्यासाठी ऑर्बिट रेझ ऑपरेशन्स करता आलं नाहीत," असं एजन्सीनं मिशन अपडेटमध्ये म्हटलं आहे. एजन्सीनं सांगितलं की, लंबवर्तुळाकार कक्षेत नेव्हिगेशनसाठी उपग्रहाचा वापर करण्यासाठी पर्यायी मोहिमेच्या धोरणांवर काम केलं जात आहे.
काय आहे उपग्रहाची सद्यस्थिती?
भारताच्या स्वदेशी अंतराळ-आधारित नेव्हिगेशन प्रणाली, नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन (NavIC) चा एक महत्त्वाचा घटक असलेला NVS 02 उपग्रह, 29 जानेवारी रोजी GSLV Mk 2 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला होता. हा उपग्रह ISRO च्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून प्रेक्षेपित करण्यात आला. श्रीहरिकोटा अंतराळ केंद्राचं हे १०० वं प्रक्षेपण होतं. हा उपग्रह आता पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार भू-समकालिक हस्तांतरण कक्षा (GTO) मध्ये फिरत आहे, जो नेव्हिगेशन प्रणालींसाठी योग्य नाही. इस्रोनं म्हटलं आहे की, "उपग्रह प्रणाली व्यवस्थित आहे आणि उपग्रह सध्या लंबवर्तुळाकार कक्षेत फीरतोय. लंबवर्तुळाकार कक्षेत नेव्हिगेशनसाठी उपग्रहाचा वापर करण्यासाठी पर्यायी मोहिमेच्या रणनीतींवर काम केलं जात आहे."
प्रगत नेव्हिगेशन पेलोड
जीएसएलव्ही रॉकेटद्वारे उपग्रह यशस्वीरित्या जीटीओमध्ये स्थापित झाल्यानंतर, त्याचं सौर पॅनेल नियोजित प्रमाणे सुरू केलंय. NVS-02 उपग्रह हा भारताच्या पुढच्या पिढीतील NavIC प्रणालीचा दुसरा उपग्रह आहे. NavIC ही एक प्रादेशिक उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली आहे, जी संपूर्ण भारतातील आणि त्याच्या सीमेपासून 1,500 किमी पर्यंतच्या वापरकर्त्यांना अचूक स्थिती, वेग आणि वेळेचा डेटा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. NVS 02 नेव्हिगेशन, शेती, आपत्कालीन प्रतिसाद, व्यवस्थापन आणि मोबाइल डिव्हाइस स्थान सेवा यासारख्या अनुप्रयोगांना फायदा करून देऊन, NavIC च्या क्षमता वाढवेल. उच्च अचूकता सुनिश्चित करण्यासाठी त्यात तीन फ्रिक्वेन्सी बँड (L1, L5 आणि S) वर कार्यरत असलेले प्रगत नेव्हिगेशन पेलोड आहे.
हे वाचलंत का :