महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 4 hours ago

ETV Bharat / politics

"महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते निराशेत"; खुद्द अमित शाहांचीच कबुली, म्हणाले, स्वबळावर... - BJP Mumbai meeting

BJP Mumbai meeting : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत मुंबईतील दादरमध्ये भाजपाची बैठक झाली. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. तसंच यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. अमित शाह नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

Assembly Election 2024
अजित पवार, एकनाथ शिंदे, अमित शाह, देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat Reporter)

मुंबईBJP Mumbai meeting:आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील दादर येथील योगी सभागृहात अमित शाह यांनी आज मंगळवार (1 नोव्हेंबर) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना अमित शाह यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम केलं. त्यासोबतच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाआघाडीचेचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं स्पष्टचं सांगितलं.

निराशेला गाडून टाकून कामाला लागा :दादर येथील योगी सभागृहात अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, "मी कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत मजल मारली असल्यानं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मला खूप आनंद होतो. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि स्थिती बदलून टाकेल, असं मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. गेल्या 60 वर्षात कोणत्याही राजकीय पक्षानं सलग 3 निवडणुका जिंकलेल्या नाहीत. सध्याच्या परिस्थितीमुळं तुमची निराशा गाडून टाका आणि कामाला लागा. महाराष्ट्रात महायुतीचेचं सरकार येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मी माझा शब्द देतो," असं आश्वासनही अमित शाह यांनी यावेळी दिलं. अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना निराशा गाडून टाका असं म्हटल्यानं त्यांनी राज्यातील भाजपाचे कार्यकर्ते निराशेत असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तबच केल्याचं दिसून येतय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्ते गाफील राहिल्याचं यावेळी कबुल केलं आहे.

राज्यात स्वबळावर सरकार आणायचं :अमित शाहांनी यावेळी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "राहुल गांधींनी किती निवडणुका जिंकल्या? 90% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यानं परीक्षेत 85% गुण मिळवले, तर तो निराश होता. पण दुसरीकडे 20 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यानं 30 टक्के मिळाले म्हणून गावात मिठाई वाटणं, हा मूर्खपणा आहे. आपण राजकारणामध्ये असून जो सरकार बनवतो, तोच विजयी असतो," असं सांगत अमित शाह यांनी महाविकास आघाडीला सुद्धा टोला लगावला. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात स्वबळावर सरकार आणायचं आहे, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा सल्लाही अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिला.

आमचं सरकार येईल, असं वाटलं नव्हतं :"राजकारणात पंतप्रधान हा कोणत्याही पदासाठी नसतो, तर महान भारताच्या रचनेसाठी असतो. सरकारं येतात आणि जातात. पण आमचं सरकार 10 वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि आम्ही कधीही आमचे विचार किंवा धोरणं सोडलं नाही," असा दावाही शाहांनी केला. "आम्ही विरोधात असताना सुद्धा काश्मीर आपलं आहे हे सांगत होतो. आमचं सरकार येईल, असं कोणाला वाटलं नव्हतं. पण आमचं सरकार आलं. आम्ही कलम 379 हटवलं, त्यानंतर आम्ही राम मंदिरही बांधलं," असंही अमित शाह यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा

  1. देवेंद्र फडणवीस घाबरलेत; भाजपा 60 जागांच्या पुढे जाऊ शकत नाही, रोहित पवारांची भविष्यवाणी - Rohit Pawar On Devendra Fadnavis
  2. "महाराष्ट्राचा बैल बाजार...", राऊतांच्या टीकेचा सदाभाऊ खोत यांनी घेतला समाचार - Sadabhau Khot On Sanjay Raut
  3. आमदार अतुल बेनकेंना पक्षात घेऊन उमेदवारी द्या; शरद पवारांकडं कोणी केली मागणी? - MLA Atul Benke
Last Updated : 4 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details