हैदराबाद : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 18 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. सध्या शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. बऱ्याच दिवसांपासून शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा पुढच्या हप्ताची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जामा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल. यावेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांची रक्कम पोहोचणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अलीकडेच ही माहिती दिली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच दिवशी किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता जारी केला जाईल", असं त्यांनी सांगितलं. या योजनेचा मुख्य उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे, जेणेकरून ते त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करू शकतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये मिळतात, जे दर 4 महिन्यांनी दिले जातात.
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागेल. या नियमांनुसार, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची माहिती आणि आधार कार्ड अपडेट ठेवावं लागेल. यासोबतच, जर एखाद्या शेतकऱ्याचं आधार कार्ड, बँक खात्यांशी जोडलेलं नसेल तर, त्यांनी आधार तत्काळ बॅंक खात्याशी जोडून घ्यावं.
19 व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती
- या योजनेअंतर्गत साडेनऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
- प्रत्येक लाभार्थ्याला 2000 रुपये मिळतील.
- एकूण वार्षिक मदत 6000 रुपये आहे, जी दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.
- या हप्त्यासाठी सरकारनं 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली आहे.
लाभार्थ्यांची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची?
- पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावरील 'शेतकरी कॉर्नर' विभागावर क्लिक करा.
- 'तुमची स्थिती जाणून घ्या' पर्याय निवडा.
- तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
- 'ओटीपी मिळवा' वर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करा.
- तुमचे पेमेंट तपशील स्क्रीनवर दिसतील.
19 व्या हप्त्यासाठी PM Kisan E KYC महत्वाची
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे फायदे मिळविण्यासाठी, तुम्हाला ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल, तर 19 व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात.
पीएम किसान योजना के अंतर्गत पंजीकृत किसानों को ई-केवाईसी करवाना अनिवार्य है। यदि आपने इस प्रक्रिया को पूर्ण नहीं किया है तो अभी दिए गए विकल्पों के माध्यम से अपनी ई-केवाईसी करवाएं व योजना का लाभ उठाएं। #PMKisanSamman #eKYC pic.twitter.com/6DWUYijUWY
— PM Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) October 5, 2024
ऑनलाइन ई-केवायसी कशी करावी :
- तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर (pmkisan.gov.in) ई-केवायसी करू शकता.
- यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर ई-केवायसीचा पर्याय निवडावा लागेल.
- आता एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
- आधार क्रमांकासह नोंदणीकृत फोन नंबरवर एक ओटीपी येईल.
- ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, सबमिट वर क्लिक करा.
- सबमिट केल्यानंतर, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
हे वाचंलत का :