बीड- गेल्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला पोलीस कोठडी द्या, अशी एसआयटीने न्यायालयाकडे मागणी केली होती. एसआयटीची मागणी मान्य करीत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं हा निर्णय दिलाय.
संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेचा विषय : डिजिटल पुरावे प्राप्त झाल्याने बीडच्या न्यायालयात युक्तिवाद करण्यात आलाय. सुदर्शन घुले आता न्यायालयीन कोठडीतून पुन्हा पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय. सुदर्शन घुलेला पोलीस कोठडी द्या, अशी मागणी एसआयटीने न्यायालयाकडे केली होती, त्यासाठी अर्जसुद्धादाखल करण्यात आला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या मोठा चर्चेचा विषय ठरत आहे, कारण या हत्याकांडाला आता तब्बल 45 दिवस उलटूनही यात अनेक गोष्टी मागे-पुढे होताना पाहायला मिळत आहेत.
कृष्णा आंधळे हा अजूनही फरार : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले न्यायालयीन कोठडीत असल्याने आता या एसआयटीनं आरोपी सुदर्शन घुलेला पोलीस कोठडी द्या, अशी मागणी केलीय आणि अर्जदेखील केलाय. सध्या आरोपी सुदर्शन घुले न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचबरोबर कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे आणि इतर आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणीसुद्धा एसआयटीनं केलीय. यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. आता या प्रकरणात नेमकं न्यायालय काय निर्णय देतंय आणि त्यावर एसआयटीचं काय म्हणणं हे पाहावं लागणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
हेही वाचा-