ETV Bharat / entertainment

'छावा'पूर्वी 'या' 5 चित्रपटांना इतिहासाशी छेडछाड केल्याबद्दल झाला होता विरोध.... - HISTORICAL FILMS

विकी कौशलच्या 'छावा'पूर्वी, इतिहासाशी छेडछाड केल्याबद्दल या 5 ऐतिहासिक काळातील चित्रपटांना विरोध करण्यात आला होता.

५ ऐतिहासिक काळातील चित्रपट
5 historical period films ('छावा'पूर्वी, इतिहासाशी छेडछाड केल्याबद्दल या 5 चित्रपटांना मोठी किंमत मोजावी लागली (चित्रपटांचे पोस्टर्स))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 27, 2025, 4:10 PM IST

मुंबई - अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे. यापूर्वी इतिहासावर आधारित असलेले जवळजवळ प्रत्येक चित्रपटाबद्दल निषेध करण्यात आला आहे. असेच आता 'छावा' चित्रपटाबद्दल देखील झालं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच विकी आणि अक्षय खन्ना यांच्या लूकबद्दल खूप कौतुक झालं आहे. 'छावा' हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान 'छावा' चित्रपटातील अनेक दृश्यांवर लोकांनी आक्षेप घेतला आहे. 'छावा'पूर्वी या 5 चित्रपटांना देखील विरोध केला गेला होता. आज आम्ही या चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहेत.

'छावा'पूर्वी 'या' 5 चित्रपटांना विरोध झाला होता.

1. 'जोधा अकबर' : 2008 मध्ये प्रदर्शित झालेला 'जोधा अकबर' चित्रपट मुघल सम्राट अकबर आणि राजपूत राजकुमारी जोधा यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. यामध्ये हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 'जोधा अकबर' चित्रपटाबद्दल असं म्हटलं जात होतं की, चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करण्यात आली आहे. काही लोक तर असेही म्हणाले होते की जोधाबाई अकबराची नाही तर, जहांगीरची पत्नी होती. राजपूत समाजानेही राजस्थानमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यासाठी निषेध केला होता.

2. 'पद्मावत' : 2018मध्ये रिलीज झालेला 'पद्मावत' चित्रपटाला देखील विरोध सहन करावा लागला होता. या चित्रपटाचं नाव पद्मावती होतं, मात्र पण करणी सेनेच्या तीव्र विरोधामुळे निर्मात्यांना त्याचं नाव बदलून 'पद्मावत' केलं होतं. या चित्रपटात राणी पद्मावतीची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आली होती. 'पद्मावत' चित्रपटात राणी पद्मावतीला 'घूमर' गाण्यावर नाचताना दाखवण्यात आलं होतं, मात्र त्यांनी कधीच नृत्य केलं नव्हतं.

चित्रपटाविरुद्ध आरोप

1. चुकीची प्रतिभा दाखवणे

2. अलाउद्दीन खिलजीचा गौरव

3. घूमर गाण्यातील नृत्यादरम्यानच्या ड्रेसवरून वाद

4. खिलजी आणि राणी पद्मावती यांच्यातील रोमँटिक दृश्य

5. राजपूतांच्या संस्कृतीला धक्का पोहचला होता.

3. 'पानीपत' : अर्जुन कपूर, कृती सेनॉन आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'पानीपत' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. या चित्रपटात महाराजा सूरजमल यांच्या व्यक्तिरेखेच्या सादरीकरणाला जाट समुदायानं तीव्र विरोध केला होता. त्यामुळे राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. यानंतर या चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणीही लोकसभेत करण्यात आली होती.

चित्रपटाविरुद्ध आरोप

1. महाराजा सूरजमल यांची भूमिका चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आली.

4. 'सम्राट पृथ्वीराज' : अक्षय कुमार स्टारर 2022 रोजी प्रदर्शित झालेला 'सम्राट पृथ्वीराज' देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हा चित्रपट सम्राट पृथ्वीराजवर आधारित आहे. आधी चित्रपटाचे नाव पृथ्वीराज होतं. दरम्यान भारताच्या एका शूर योद्ध्याचे नाव अशा प्रकारे घेणे हा त्यांचा अपमान आहे, त्यामुळे या चित्रपटाचं नाव बदलून 'सम्राट पृथ्वीराज' असं ठेवण्यात आलं. तसेच गुर्जर समुदायाचा दावा होता की, सम्राट हा गुर्जर समुदायाचा राजा होता. मात्र चित्रपटात त्याला क्षत्रिय राजा म्हणून दाखवण्यात आलं होतं.

5 . 'पोन्नियान सेल्वन' : मणिरत्नम यांचा 'पोन्नियान सेल्वन' चित्रपटला प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक वादांना सामोरी जावं लागलं होतं. या चित्रपटात चोल साम्राज्याच्या शैव संप्रदायकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. या चित्रपटात सुपरस्टार चियान विक्रम हा मुख्य भूमिकेत दिसला होता.

चित्रपटाविरुद्ध आरोप

1. चोलांच्या शैव संप्रदायकडे दुर्लक्ष करणे

2.आदिधा करिकालनच्या मारेकऱ्यांना ब्राह्मण म्हणून दाखवण्यात आलं नव्हतं.

3. चित्रपट निर्माते वेट्रीमारन यांनी एक विधान केलं होत की, राजारज चोल हे हिंदू नव्हते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.