महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

‘तेही आमच्यासोबत भाजपासारखेच वागले’; तर इंडिया आघाडीत राहायचं की नाही?...; कपिल पाटलांची पोस्ट चर्चेत - Kapil Patil On Mahavikas Aaghadi

Kapil Patil On Mahavikas Aaghadi : विधान परिषदेच्या अकरा जागांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये महायुतीची सरशी झाली. त्यांचे नऊही उमेदवार निवडून आले. तर महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसचे एक उमेदवार निवडून आले. शरद पवार गट पुरस्कृत शेकापाचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला. यावरूनच आता कपिल पाटील (Kapil Patil) यांनी महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केलीय.

Kapil Patil On Mahavikas Aaghadi
महाविकास आघाडी (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 3:38 PM IST

मुंबई Kapil Patil On Mahavikas Aaghadi:विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या पराभवानंतर इंडिया आघाडीत खटके उडू लागले आहेत. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पराभवानंतर कपिल पाटील (Kapil Patil) यांची एक पोस्ट चर्चेत आलीय.इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठ्या पक्षांचे वागणे किती अयोग्य होते, तेही भाजपासारखेच वागले, असं म्हणत समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी इंडिया आघाडीवर जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

इंडिया आघाडीबरोबर राहायचं की नाही : यावेळी कपिल पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत दिंडोरी येथे आम्ही उमेदवार देत असतानाही या पक्षांनी उमेदवार दिला, अशा अनेक घटना आहेत. आता आम्ही "इंडिया आघाडीबरोबर राहायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं, मी माझ्या ब्लॉगवरून आणि ट्विटरद्वारे माझ्या भावना मांडल्या आहेत" आता उत्तर त्यांना द्यायच आहे.


कपिल पाटील यांचे भावनिक ट्वीट :कपिल पाटील यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ''इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपाने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले? भाजपासारखेच?'', अशी खदखद कपिल पाटील यांनी बोलून दाखवली.



लढूया, जिंकूया :मुंबई शिक्षक मतदार संघातून ते सलग तीन वेळा निवडून आले. 18 वर्षे त्यांनी शिक्षकांचे प्रतिनिधीत्व केलं. आता मुदत संपल्यानं त्यांनी सर्वांची रजा घेतली. त्यावेळी त्यांच्या भावना दाटून आल्या. त्यांनी निरोपाच्या संदेशात म्हंटलं की, ''विधिमंडळातील 18 वर्षांच्या संघर्षाला स्वल्पविराम देत विधान परिषदेचा निरोप घेताना, या संघर्षात सोबत असलेल्या मुंबईच्या सर्व शिक्षकांना आणि सर्व सहकारी साथींना सलाम! लढूया, जिंकूया!''. तर छोट्या पक्षांनी आता इंडिया आघाडीवर कसा विश्वास ठेवायचा आणि पुढे जायचं, असा सवाल करत या पक्षांकडून योग्य वागणूक मिळण्याची अपेक्षा व्यक्त केलीय.

हेही वाचा -

  1. "विरोधकांना समाज नाही तर निवडणुका महत्वाच्या...", देवेंद्र फडणवीसांचा आरक्षणाच्या बैठकीवरून विरोधकांवर हल्लाबोल - Maratha OBC Reservation
  2. विधानपरिषदेत महायुतीचा दबदबा कायम; उबाठा गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी, तर शरद पवारांना धक्का - Maharashtra MLC Results 2024
  3. महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा... - Maharashtra Politics

ABOUT THE AUTHOR

...view details