ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सादाब रिझवी मेरठ (उत्तर प्रदेश) Jayant Chaudhary joins NDA : चौधरी अजित सिंह यांच्या जयंतीनिमित्त आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांनी सर्व शक्यतांचा पर्दाफाश केलाय. आपण आता भाजपाप्रणीत एनडीएचा भाग असल्याचं आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी स्पष्ट केलंय. आपण कोणतंही मोठं नियोजन करुन ही घोषणा केली नसल्याचंही जयंत चौधरींनी म्हटलंय.
आमदार व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेतला निर्णय : राष्ट्रीय लोकदल (राजद) अध्यक्ष जयंत चौधरी यांनी स्पष्ट केलंय की, ते आता इंडिया आघाडीतून बाहेर पडून आता एनडीए आघाडीत सामील झाले आहेत. याबाबत त्यांनी सोमवारी दिल्लीत निवेदनही जारी केलंय. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, पक्षाच्या सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेतलाय. तसंच या निर्णयामागं कोणतंही मोठं नियोजन नसल्याचं जयंत म्हणाले. आम्हाला लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे, त्यांमुळं अल्पावधीतच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याचं जयंत चौधरी म्हणाले.
जागावाटपाबाबत निश्चिती नाही :आरएलडी किती जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार हे अद्याप ठरलेलं नाही. जेव्हापासून पंतप्रधान मोदींनी चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली तेव्हापासून आरएलडी एनडीएशी हातमिळवणी करेल, असं मानलं जात होतं. वडिलांच्या जयंतीनिमित्त प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सस्पेन्स आता संपलाय.
एनडीएसोबत जाण्याची घोषणा करणं जयंतची मजबुरी : याबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सादाब रिझवी म्हणतात की, जयंत यांच्यासाठी ही घोषणा करणं अपरिहार्य बनलं होतं. कारण आरएलडीचे चार आमदार राम लल्लाच्या दर्शनासाठी सीएम योगींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत गेले नाहीत. त्यापैकी दोन आमदार मुस्लिम होते. त्यामुळं आरएलडीमध्ये फूट पडली की काय, अशी राजकीय चर्चा रंगली. त्यामुळं यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आरएलडी अध्यक्षांनी मीडियासमोर येऊन आपण एनडीएचा एक भाग असल्याचं मान्य केलंय. या आघाडीचा भाजपला पश्चिम उत्तर प्रदेशात मोठा फायदा होईल. जाट मतदारांचा एक वर्ग आधीच भाजपासोबत जात होता, आता आरएलडीसोबत युती केल्यानं परिस्थिती आणखी मजबूत होईल, असंही ते म्हणाले.
हेही वाचा :
- Samajwadi Party Rajya Sabha Candidate : समाजवादी पक्षाकडून राज्यसभेकरिता जयंत चौधरी यांचे नाव जाहीर