ETV Bharat / politics

गुजरातचं ड्रग्ज कनेक्शन परळीत, सुरेश धस यांचा जनआक्रोश मोर्चात सनसनाटी आरोप - SURESH DHAS ON DHANANJAY MUNDE

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धारशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात धस यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं.

Suresh Dhas on Dhananjay Munde
सुरेश धस (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2025, 10:54 PM IST

धाराशिव : पाकिस्तानातून तस्करी मार्गे गुजरातमध्ये सापडलेल्या 890 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचं परळी कनेक्शन असल्याचा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला. "गृह विभागानं या बाबीचा सखोल तपास करायला हवा. गुजरातच्या ड्रग्जसोबत असलेलं परळी कनेक्शन पाकिस्तानी आतंकवादी संघटनांशी तर जोडलं गेलं नाही ना?" असा सवाल उपस्थित करत धाराशिव येथील जनआक्रोश मोर्चात आमदार सुरेश धस यांनी सनसनाटी आरोप केले.

जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी (11 जानेवारी) जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मनोज जरांगे, आमदार सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, दीपक केदार, नरेंद्र पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार प्रविण स्वामी, सचिन खरात, वैभवी संतोष देशमुख आदी उपस्थित होते. शहरातील जिजामाता चौक येथून हा मोर्चा निघाला. आर्य समाज मंदिर, संत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप झाला. या मोर्चामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्व धर्म आणि सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते.

मोर्चात बोलताना आमदार सुरेश धस (ETV Bharat Reporter)

संंतोष देशमुख यांची हत्या संतापजनक : "सत्तेच्या आडोशाला राहून अफाट संपत्ती कमवणारी ही मुजोर गुंडशाही आहे. या गुंडांचा अन्याय सहनही केला असता. मात्र ज्या पद्धतीनं त्यांनी संंतोष देशमुख यांची हत्या घडवून आणली आहे. ते सर्व काही संतापजनक आहे. याप्रकरणातील अन्य आरोपींना मोक्का लावल्याचं समजलं. मात्र यातील मास्टरमाईंड आणि खंडणीच्या आरोपात अटकेत असलेल्या गुन्हेगाराला मात्र मोक्का लावला नाही, याचं कारण समजलं नाही" असं सुरेश धस म्हणाले.

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचे दाखवले फोटो : "गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणात परळी कनेक्शन पाकिस्तानी आतंकवादी संघटनांशी तर जोडले गेले नाही ना?," असा प्रश्न उपस्थित आमदार सुरेश धस यांनी केला. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा फोटो यावेळी त्यांनी जनसमुदायास दाखवला. खरीप पीक विमा 2023 मध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही सुरेश धस यांनी धारेवर धरलं. पीक विमा घोटाळ्याप्रकरणी आरोपींना प्रशासन कुणाच्या सांगण्यावरुन पाठीशी घालत आहे, यांची ही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तर "खून करणारे आणि घडवून आणण्यासाठी कट रचणार्‍या सगळ्यांना फाशी व्हायला हवी. त्यांना पाठीशी घातल्यास भविष्यात दिवस उघडायच्या आत लोकांचे मुडदे पडतील," अशा शब्दांत आमदार धस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू : यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशी होण्यासाठी तपास यंत्रणांनी सखोल तपास करावा आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असं आश्वासन सुरेश धस यांनी दिलं. या जनआक्रोश मोर्चात जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांतील पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. मोर्चानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडं विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.

हेही वाचा -

  1. "एका महिन्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, पण उद्धव ठाकरे...", नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट? वाचा सविस्तर
  2. "स्वतंत्र लढा किंवा एकमेकांच्या डोक्यावर बसून...", विखे पाटलांचा हल्लाबोल
  3. महाविकास आघाडीमध्ये फूट? संजय राऊत यांची मोठी घोषणा; म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.