मुंबई- महापुराच्या धर्तीवर राज्य शासनाने जुलै 2005 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची स्थापना केली होती. गेल्या अडीच वर्षांत आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरण समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे होते. मात्र, आता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या पुनर्रचनेत काही बदल करण्यात आलेत. यातून चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच वगळ्यात आलंय. त्यामुळं शिंदेंना गटातून नाराजी व्यक्त होत असताना यावर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आलीय. तर आता दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा समावेश करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांत बदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
फडणवीसांचा शिंदेंना मोठा धक्का : एकीकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलून अर्थमंत्री अजित पवार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळं विविध तर्कवितर्क काढले जाताहेत. शिंदेंना डावलण्यात आल्यामुळं फडणवीसांचा शिंदेंना धक्का मानला जातोय. या निर्णयावरुन शिंदे गटात नाराज पसरली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. "मला माहीत नाही... मला माहीत नाही, आपत्ती व्यवस्थापन समिती कधी झाली? पण मला एवढे माहीत आहे की, जिथे जिथे आपत्ती येते, आपदा येते, संकट येते, महापूर येतो तिथे हा एकनाथ शिंदे उभा असतो." राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचना समितीतून वगळण्यात आल्यानंतर अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिल्यानं महायुती सरकारमध्ये सुंदोपसुंदी असल्याचं बोललं जातंय.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेतील नवनियुक्ती
मुख्यमंत्री - अध्यक्ष
उपमुख्यमंत्री वित्त - सदस्य
महसूल मंत्री - सदस्य
सार्वजनिक आरोग्य मंत्री - सदस्य
आपत्ती व्यवस्थापन मंत्री - सदस्य
मदत आणि पुनर्वसन मंत्री - सदस्य
आयआयटी मुंबई - अशासकीय सदस्य
आयआयटी मुंबई - सदस्य
मुख्य सचिव - पदसिद्ध सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी
हेही वाचा -