ETV Bharat / state

कोकणात महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांचा सतीश लळीत यांनी लावला शोध - SEVEN MONOLITH MONUMENTS

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पुरातत्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत (satish lalit) यांनी कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांचा शोध लावला आहे.

Seven Monolith Monuments
महापाषाणकालीन एकाश्मस्तंभ (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2025, 10:43 PM IST

रत्नागिरी : कुंभवडे (ता.राजापूर) येथील महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारके पुरातत्व संशोधक सतीश लळीत (satish lalit) यांनी प्रथमच उजेडात आणली आहे. यामुळं कोकणच्या प्राचीन इतिहासावर नवा प्रकाश झोत पडणार आहे. कोकणातील या प्रथम शोधाची घोषणा लळीत यांनी पुणे येथे 'आय-सार्क' राष्ट्रीय परिषदेत केली. भारतात महापाषाण संस्कृतीचा काळ साधारणपणे इसपू १५०० ते ४०० वर्षे मानला जातो.

पुण्यात पाचवे राष्ट्रीय अधिवेशन : पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भारतीय मूर्तीशास्त्र आणि स्थापत्य संशोधन परिषदेचे पाचवे राष्ट्रीय अधिवेशन १० आणि ११ जानेवारी रोजी पार पडले. या परिषदेत लळीत यांनी याबाबतचा शोधनिबंध सादर केला. बनारस हिंदु विद्यापीठाचे प्रा. शांती स्वरुप सिन्हा सत्रप्रमुख आणि डॉ. अरविंद सोनटक्के अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील लळीत हे निवृत्त शासकीय अधिकारी असून कातळशिल्प अभ्यासक आहेत. ६ मे २००१ रोजी त्यांनी सिंधुदुर्गातील पहिल्या कातळशिल्प स्थळाचा शोध लावला. गेली २४ वर्षे ते यावर संशोधन करत असून त्यांनी या विषयावर एक पुस्तकही प्रकाशित केलं आहे.

Seven Monolith Monuments
महापाषाणकालीन एकाश्मस्तंभ (ETV Bharat Reporter)

जांभ्या दगडाची एकूण सात एकाश्मस्तंभ स्मारके : लळीत यांना एका संशोधकीय सर्वेक्षणात कुंभवडे येथील गंभीरेश्वर मंदिराजवळ जांभ्या दगडाची एकूण सात एकाश्मस्तंभ स्मारके आढळून आली. ही स्मारके म्हणजे एकाच दगडातून खोदून काढून उभे केलेले उभे पाषाण आहेत. मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्वाचा कालखंड म्हणजे महापाषाण संस्कृतीचा (मेगालिथिक कल्चर) काळ होय. भारतातील महापाषाण संस्कृतीची कालनिश्चिती अद्याप निर्णायक झालेली नसली तरी सर्वसाधारणपणे इ.स.प पंधराशे ते चारशे वर्षे हा काळ महापाषाण संस्कृतीचा मानला जातो. या संस्कृतीमध्ये मोठ्या दगडी शिळांचा वापर केला गेल्याने ती जगभरात महापाषाण संस्कृती म्हणून ओळखली जाते.

जगाच्या अनेक भागात एकाश्मस्तंभ : एकाश्मस्तंभांना इंग्रजीत मेनहिर असे म्हटले जाते. महापाषाणकालीन संस्कृतीमध्ये मृत व्यक्तींचे दफन केल्यावर त्यांचे स्मारक म्हणून एकाश्मस्तंभ उभे केले जाते. मोठे दगड (मेगालिथ) जमिनीत उभे पुरले जाते. जगाच्या अनेक भागात असे एकाश्मस्तंभ आढळतात. अशी एकाश्मस्तंभ स्मारके इंग्लंड, आयर्लंड, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक वगैरे देशात आढळली आहेत. महापाषाण संस्कृतीमधील एकाश्मस्तंभ स्मारके ही मानवनिर्मित सर्वात प्राचीन स्मारके मानली जातात. महाराष्ट्रात विदर्भातील चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात अशी एकाश्मस्तंभ स्मारके याआधी मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. कर्नाटक, तेलंगण, आंध्र, तामिळनाडु, मणिपूर राज्यातही अशी एकाश्मस्तंभ स्मारके आढळतात.

कोठे आढळली एकाश्मस्तंभ ?: लळीत यांना कुंभवडे येथे एकूण सात एकाश्मस्तंभ आढळून आले. ते गंभीरेश्वर मंदिर (गांगो मंदिर) परिसरात तीन गटात विभागले गेले आहेत. सात स्तंभांपैकी पाच उभ्या स्थितीत असून दोन निखळून पडलेल्या आडव्या स्थितीत आहेत. मंदिरासमोरुन नाणार फाटा – कुंभवडे - उपळे रस्ता जातो. या रस्त्यावर मंदिराकडं वळणाऱ्या फाट्यावर दोन स्तंभ आहेत. मध्यम आकाराचा एक स्तंभ उभा असून दुसरा मोठ्या आकाराचा स्तंभ आडवा पडला आहे. याच रस्त्याने सुमारे तिनशे मीटर पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टाकीजवळ एक मध्यम आकाराचा पाषाणस्तंभ उभ्या स्थितीत आहे. मंदिराच्या पश्चिम बाजुला सुमारे तीनशे मीटर अंतरावर असलेल्या एका मळ्यात एकूण चार पाषाणस्तंभ पहायला मिळतात. यापैकी दोन लहान आकाराचे, एक मध्यम आकाराचा तर एक मोठ्या आकाराचा आहे. या चार पाषाणस्तंभापैकी लहान आकाराचा एक आडवा पडलेला असून तीन उभ्या स्थितीत आहेत. हे एकाश्मस्तंभ स्थानिक उपलब्ध असलेल्या जांभ्या दगडांमधून खोदून काढलेले आहेत. उभ्या असलेल्या सर्व पाषाणस्तंभांची दिशा पूर्व-पश्चिम आहे. सर्वात लहान एकाश्मस्तंभाची उंची २.५ फुट, रुंदी २ फुट व जाडी ५ इंच आहे. सर्वात मोठ्या एकाश्मस्तंभाची उंची सव्वाआठ फुट, रुंदी ३ फुट आणि जाडी १० इंच आहे.

कोकणात एकाश्मस्तंभ : कोकणचा प्रागैतिहास अद्याप अज्ञात आहे. सुसरोंडी (गुहागर) आणि कोळोशी (कणकवली) येथील मानवी वसतिस्थाने असलेल्या गुहा या दोन अतिप्राचीन काळातील संदर्भांशिवाय पश्चिम किनारपट्टीवरील कोकण प्रदेशात अश्मयुगात मानवी वस्ती असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नव्हते. काही वर्षांपुर्वी साधारणपणे मध्याश्मयुगाच्या शेवटच्या आणि नवाश्मयुगाच्या काळातील कातळशिल्पे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात सापडल्यानं कोकणातील मानवी अस्तित्वाच्या वाटचालीतील एक महत्वाचा दुवा सापडला आहे. यावर्षी मला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात महापाषाण काळातील एकाश्मस्तंभ (मेनहिर) आढळले आहेत. कोकणात एकाश्मस्तंभ (मेनहिर) आढळल्याची ही पहिलीच घटना आहे, असा दावा सतीश लळीत यांनी केला आहे.

कातळशिल्पे उजेडात येऊ लागले : कोकण प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील, प्राचीन काळातील मानवी संस्कृतींचा शोध घेण्यासाठी अत्यंत कमी साधने आणि संदर्भ उपलब्ध असल्यामुळं हा काळ यादृष्टीनं अंधारयुग (डार्क एज) म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षात गुहांची मानवी वसतिस्थाने, शिळावर्तुळे, कातळशिल्पे असे अनेक संदर्भ उजेडात येऊ लागले आहेत. यामुळं या अंधार युगाची एकएक खिडकी किलकिली होऊ लागली आहे. कुंभवडे (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) येथील महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांच्या (मेनहिर) या शोधामुळं या साखळीतील आणखी एक महत्वाचा दुवा मिळाला आहे, असं लळीत यांनी म्हटलं आहे.

शोधनिबंधात लळीत यांनी दिली खात्री : आतापर्यंत कोकणात सापडलेली मानवी वसतिस्थाने, गुहा, दगडी शस्त्रे, शिळावर्तुळे, कातळशिल्पे आणि एकाश्मस्तंभ यांचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण, संशोधन होणं अतिशय आवश्यक आहे. यामुळं कोकण प्रदेशातील प्राचीन मानवी संस्कृतींच्या अस्तित्वावर नवा प्रकाश पडु शकेल. या सर्व ठिकाणांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी शासनाने ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारके म्हणून जाहीर केली पाहिजेत. अज्ञान, अनास्था, जमिनींची विक्री आणि विकास, खाणी, विविध प्रकल्प यात या पुरातत्व स्थळांचं नुकसान होण्याची किंवा ती नष्ट होण्याची शक्यता आहे. एकंदरीत कुंभवडे येथील हे महापाषाणकालीन एकाश्मस्तंभ महापाषाण काळात पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या मानवी समुहांच्या, तत्कालिन संस्कृतींच्या चालीरिती, श्रद्धा, उपासनापद्धती यांच्या अभ्यासात महत्वाचा दुवा ठरणार आहेत, अशी खात्री लळीत यांनी त्यांच्या शोधनिबंधात व्यक्त केली आहे.

हेही वाचा -

  1. Ajanta Caves Light : अजिंठा लेणी आता एलईडीने चमकणार; तब्बल 21 वर्षांनी बदलणार बल्ब
  2. "भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले...", कुसुमाग्रजांच्या नावानं उभारलेलं उद्यान मोजतंय अखेरच्या घटका
  3. वॉल पेंटिंग नव्हे वॉल प्लेटिंगचा टेण्ड, उत्तराखंडच्या महिलेनं कलेतून 50 हून अधिक मुलींना दिला रोजगार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.