ETV Bharat / state

आयशर पिकअपचा भीषण अपघात; मुंबई आग्रा महामार्गावर 6 कामगार ठार, अनेक जखमी - NASHIK ACCIDENT NEWS

नाशिकमध्ये भीषण अपघात (Nashik Accident) झाला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून, पाच ते सहा जण गंभीर जखमी आहेत.

Nashik Accident
नाशिक अपघात (file Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2025, 10:28 PM IST

नाशिक : शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाण पुलावर पिकअप अन् आयशरचा भीषण अपघात (Nashik Accident) झाला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून, पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर पिकअप आणि आयशरमध्ये हा अपघात झाल्यानं मोठी खळबळ उडाली. आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीनं धडक दिली. या घटनेत मृत्यू झालेले सर्वजण कामगार असल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप अपघातातील मृतांची नावं समोर आलेली नाहीत.

द्वारका उड्डाणपुलावर वाहतूक विस्कळीत : नाशिक मुंबई अग्रा महामार्गावरील भीषण अपघातानंतर नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाशिकवरुन मुंबईकडं जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. उड्डाण पुलावर वाहतूक ठप्प झाल्याचं दिसून येत आहे. वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून गेल्या 30 मिनिटांपासून वाहतूक ठप्प आहे.

वाहनांचं मोठं नुकसान : हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. वाहनांचा चुरडा झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यात अपघातात सरपंचाचा मृत्यू : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन वातावरण तापलेलं असताना, आज बीड जिल्ह्यात पुन्हा एका सरपंचाचा अपघातात मृत्यू झाला. परळी धर्मापुरी मार्गावरील मिरवट फाट्यावर राखीची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकीला धडक दिल्यानं सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. ते सौंदाना गावचे सरपंच होते.

हेही वाचा -

  1. नांदगाव मनमाड महामार्गावर दोन गाड्यांचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू - Nashik Accident
  2. पाईपलाईन कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद - Nashik Accident News
  3. दुधाचा टँकर दरीत कोसळल्यानं कसारा घाटात भीषण अपघात; पाच ठार, चार जण गंभीर जखमी - Nashik accident in Kasara ghat

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.