ETV Bharat / politics

भाजपाकडून रवींद्र चव्हाण यांची प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड, महाविजय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घोषणा - RAVINDRA CHAVAN REACTION

डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची शनिवारी भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलीय. या निवडीनंतर आमदार चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

bjp mla ravindra chavan first reaction after he appointed as working state president of maharashtra
रवींद्र चव्हाण (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2025, 7:39 AM IST

Updated : Jan 12, 2025, 8:29 AM IST

शिर्डी : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भातील पत्रक जारी केलं. भाजपाचं आज (12 जानेवारीत) शिर्डीत एक दिवसीय महाविजय अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी सोपविली आहे.

काय म्हणाले रवींद्र चव्हाण? : नियुक्तीनंतर माध्यमांशी बोलतांना रवींद्र चव्हाण म्हणाले की, "भाजपा हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. हे या नियुक्तीतून पुन्हा सिद्ध झालंय. कार्यकर्ता म्हणून काम करताना कोणतीही अपेक्षा न करता एका विचारधारेबरोबर काम केलं जातं. जबाबदारीच ओझं खांद्यांवर येतं. तेव्हा दडपणही येतं. कार्यकारी अध्यक्ष ही तशी फार मोठी जबाबदारी आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाखालील पूर्ण बहुमताचं महायुतीच चांगलं सरकार आहे. राज्यातील जनतेच्या अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होतील", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढं आमदार चव्हाण म्हणाले, "सरकारबरोबर संघटना आणि संघटनेचा कार्यकर्ता असणं खूप गरजेचं असतं. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारचं काम पोहोचवणं हेच खऱ्या अर्थानं संघटना आणि कार्यकर्त्यांचं काम असल्याचा पंडित दीनदयाळजी यांनी संदेश दिला होता. देवेंद्र फडणवीसांनी सर्व विभागांना 100 दिवसांचा कार्यक्रम दिलाय. त्याद्वारे ते अतिशय गतिमान पद्धतीनं सरकारच्या योजना कार्यान्वित करतील. परंतु, ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचं काम संघटना आणि कार्यकर्त्यांचं असणार आहे. त्यामुळं ते एक मोठे आव्हान असणार आहे. राज्य संघटनेतील कार्यकर्त्यांच्या मदतीनं ते काम नक्कीच पुढं नेण्याचा प्रयत्न करू", अशी त्यांनी ग्वाही दिली.

रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्य नेतृत्वानं माझ्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून माझा मोठा सन्मान केलाय- रवींद्र चव्हाण

साईबाबांचा आशीर्वाद माझ्यासोबत : "साईबाबांच्या शिर्डीत माझ्या नावाची घोषणा झाली. नक्कीच साईबाबांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी एकसंघपणे काम केलं. राष्ट्रीय नेतृत्वाचं संपूर्ण लक्ष या निवडणुकीवर होतं. त्यांच्या नेतृत्वामुळं हे सर्व यश मिळवणं शक्य झालं. यश आणि यशाचे अनेकजण मानकरी असतात", असं चव्हाण म्हणाले. " येणाऱ्या काळात जनतेच्या सेवेबरोबरच त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे खूप गरजेचं आहे. निवडणुका येतील आणि जातील. यश आणि अपयश यांचा विचार न करता जनतेला सरकारचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल, यासाठी जास्त प्रयत्न करण्याची ग्वाहीही चव्हाणांनी दिली. "दीड कोटी सदस्यांचे उद्दिष्ट गाठण्याचं संघटनेचं नियोजन आहे. येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी आणि त्यांच्या मर्जीनं आवश्यक गोष्टी करण्याचा प्रयत्न करू," असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

आज कसे असणार भाजपाचे अधिवेशन?विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर साईनगरीत आज राज्यस्तरीय अधिवेशनास सकाळी सुरवात होईल. राज्यातून तब्बल 22 हजार पदाधिकारी या अधिवेशनाला येणार आहेत. सकाळी पक्षाचा ध्वज फडकावून आणि प्रतिमा पूजनाने अधिवेशनाचा श्रीगणेशा होईल. तर सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शांहांच्या भाषणाने समारोप होईल. त्या आधी गृहमंत्री अमित शाह हे शनि शिंगणापूर आणि साई समाधीचे दर्शन घेतील. शाह यांच्या हस्ते संविधान पूजनही करण्यात येणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नियोजनासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आठ दिवसांपासून शिर्डीत तळ ठोकून आहेत. मंडप, स्टेज, बैठक, भोजन, वाहनतळ, निवास यांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा -

  1. "एका तरुणाचे 9 कोटी रुपयांसाठी अपहरण", नाना पटोलेंचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप, आता चव्हाण म्हणतात...
  2. डोंबिवलीचे भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात प्रदेश प्रभारी पदाची माळ! 'वाचा' चव्हाणांचा राजकीय प्रवास

Last Updated : Jan 12, 2025, 8:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.