ETV Bharat / state

बनावट आधार कार्ड काढून राहणाऱ्या ७ बांगलादेशींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कुठे सापडले बांगलादेशी? - BANGLADESHIS IN NAVI MUMBAI

नवी मुंबईत पुन्हा एकदा बेकायदेशीरपणं वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिक आढळून आले आहेत. पोलिसांनी त्यांना शनिवारी ताब्यात घेतलं असून कारवाई केली आहे.

bangladeshis in Navi Mumbai, seven bangladeshis detained by navi mumbai police
बांगलादेशी नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2025, 7:20 AM IST

नवी मुंबई : बांगलादेशी नागरिकांचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचं आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडालीय. याच पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं बघायला मिळतंय. त्यातच तुर्भे, नेरूळ खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय.

अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशांसाठी सोळा पथकं तैनात : नवी मुंबई परिसरात विशेषतः गावठाणांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बांगलादेशी राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्या अनुषंगानं या बांगलादेशींवर कारवाई करण्यासाठी जवळपास 16 पथकं नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून तैनात करण्यात आली. पहाटे साडेतीन पासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीतील पेंढरगाव, तळोजा, खारघर, करावे, सीवूड्स, नेरूळ गाव, सारसोळे गाव, वाशी गाव इंदिरानगर, केके आर रोड, तुर्भे एमआयडीसी, कामोठे, कळंबोली स्टील मार्केट परिसरातील झोपडपट्टी परिसरात एकाच वेळी कारवाई करण्यात आली.

बांगलादेशी नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई (ETV Bharat Reporter)

265 संशयास्पद व्यक्तींची तपासणी : यावेळी 265 संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण सात बांगलादेशी गेल्या पाच ते वीस वर्षांपासून नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत राहत असल्याचं उघडकीस आलं. त्यांनी बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखले बनवल्याची बा देखील लक्षात आली. तुर्भे परिसरात चार अवैध बांगलादेशी आणि त्यांना आश्रय देणारे दोन भारतीय नागरिक यांच्यावर गुन्हे शाखेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलीय. त्याचबरोबर नेरूळ आणि खांदेश्वर पोलिसांच्या हद्दीत देखील दोन अनधिकृत बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे.

  • बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई : अवैध बांगलादेशींना घर भाड्यानं दिल्यास किंवा त्यांना कामावर ठेवल्यास संबंधित घरमालक, बांधकाम व्यावसायिक आणि अवैध बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या इतर व्यक्तींवर परकीय नागरिक कायदा कलम 14 (क) तसंच रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेन ऍक्ट अन्वये अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असं नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. ३० वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बांगलादेशी बहिणीला भेटायला आली अन् गजाआड झाली
  2. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांचा सुळसुळाट : किरीट सोमय्या
  3. बांगलादेशींना दिले जन्मदाखले: मालेगावचे तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार संदीप धरणकर निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.