महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"गल्लीतील नेत्यानं...", नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर फडणवीसांचं उत्तर

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : भाजपाचे ‘टॉप परफॉर्मर’ नेते अर्थातच मंत्री नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या पहिल्या यादीत स्थान मिळालं नाही. यावरुन विरोधक भाजपा नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. नितीन गडकरींच्या उमेदवारीची घोषणा अद्यापही न झाल्यामुळं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना मविआसोबत येण्याची ऑफर दिली आहे. त्यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय.

Devendra Fadnavis taunt to Uddhav Thackeray about his offer tob Nitin Gadkari
नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर फडणवीसांचं उत्तर

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 5:42 PM IST

उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना दिलेल्या ऑफरवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

नागपूर Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच भाजपानं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 195 उमेदवारांचा समावेश असून महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव या यादीत जाहीर करण्यात आलेलं नाही. तसंच या यादीत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचं नाव नसल्यानं विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर भरसभेत गडकरींना महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या ऑफरवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केलाय.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस :या संदर्भात आज (8 मार्च) नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,"उध्दव ठाकरेंच्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय. त्यांनी नितीन गडकरी यांना ऑफर देणं म्हणजे गल्लीतील नेत्यानं मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करतो असं म्हणणं आहे. गडकरी आमचे मोठे नेते असून जेव्हा महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा सर्वप्रथम त्यात गडकरींचं नाव राहील. त्यामुळं अशी विधानं करून उद्धव ठाकरे केवळ स्वतःचं हसू करून घेतायत."

मराठा आरक्षणावर काय म्हणाले :मराठा आरक्षणानुसार पदभरती आणि शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. याविषयी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा एखादा मुद्दा न्यायालयासमोर असतो तेव्हा अशाच प्रकारचे निर्देश न्यायालयात देत असतं. त्यात नवीन काहीही नाही. या अगोदरही जेव्हा न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं, तेव्हा न्यायालयाच्या अटी आणि शर्तीनुसारच भरती प्रक्रिया करायला सांगितली होती." तसंच मी अद्याप न्यायालयाचा निर्णय ऐकला नसून, हे सर्व मी माझ्या अनुभवानुसार सांगत असल्याचंही ते म्हणाले.

सुप्रिया सुळेंना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही :आज सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत असताना 'अब की बार गोळीबार सरकार' म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावर उत्तर देत फडणवीस म्हणाले की, मी सुप्रिया सुळेंना इतकंच विचारेन, मावळमध्ये गोळीबार झाला, गोवारी समजातील लोकांवर पोलिसांनी केलेल्या लाठचार्जमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तेव्हा या राज्यात कोणाचं सरकार होतं? सुप्रिया सुळे विरोधी पक्षात आहेत, म्हणून त्या टीका करतात त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही."

हेही वाचा -

  1. 'शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यानं साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...'; फडणवीसांचा पवारांना खोचक टोला
  2. बनावट कागदपत्राचा घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई सुरू; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
  3. खासदार सुप्रिया सुळेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका; म्हणाल्या 'अजून किती जुमले पाहायला मिळणार'

ABOUT THE AUTHOR

...view details