नागपूर Lok Sabha Election 2024 :लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सोमवारी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. मात्र, हे 'संकल्प पत्र' नसून मोदी सरकारची गॅरंटी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हणाले आहे. भारताला उज्वल भविष्य घडवण्याची ही सर्वोत्तम वेळ आणि संधी आहे, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले. भाजपाच्या संकल्प पत्रावर 4 जूननंतर वेगात काम सुरू होईल. सरकारनं सुरुवातीच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यावर ही काम सुरू केली आहेत. देशातील 140 कोटी देशवासीयांची महत्त्वाकांक्षा म्हणजे 'मोदींचं मिशन' असल्याचं ते म्हणाले.
विकसित भारताचा दृष्टीकोन : भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्रात एनडीए सरकारच्या कामगिरीचा सर्वसमावेशक व्यापक आढावा दिसून येतोय. 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करण्याचा दृष्टीकोन सादर करतो. हा जाहीरनामा विकसित भारताच्या युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या 4 मजबूत स्तंभांना सामर्थ्य देतो. आमचं लक्ष्य जीवनाची प्रतिष्ठा, जीवनाचा दर्जा, तसेच गुंतवणूक आणि नोकऱ्यांवर असल्याचं फडणवीस म्हणाले.
नोकऱ्या निर्माण करण्याबद्दल विचार: या संकल्प पत्रात संधींचं प्रमाण आणि संधींची गुणवत्ता दोन्हींवर भर देण्यात आला आहे. एकीकडं, आपण अनेक पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण करण्याबद्दल बोलत आहोत. दुसरीकडं, आम्ही स्टार्टअप्स आणि जागतिक केंद्रांना प्रोत्साहन देऊन उच्च मूल्यांच्या सेवांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. गरिबांच्या ताटात पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे अन्न असेल याची आम्ही खात्री देऊ. मोफत रेशन योजना पुढील 5 वर्षे सुरू राहील,अशी मोदींची हमी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
वृद्धांसाठी संकल्प : भाजपानं संकल्प केला आहे की, 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणलं जाईल. 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असो, त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे. ज्यांना कोणी विचारलं नाही, त्यांना मोदी विचारत आहेत. 'सबका साथ, सबका विकास' हाच आत्मा आहे आणि हाच भाजपाच्या 'संकल्प पत्रा'चा आत्मा देखील आहे.
स्त्री शक्तीच्या सहभाग असेल: गेली 10 वर्षे महिलांचा सन्मान आणि महिलांसाठी नवीन संधींसाठी प्रयत्नरत राहिलो आहोत. येणारी 5 वर्षे स्त्री शक्तीच्या नव्या सहभागाची असतील.