महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक, राज्यातील केवळ 'या' नेत्याचा समावेश - congress 40 star campaigners - CONGRESS 40 STAR CAMPAIGNERS

ऑक्टोबरमध्ये पार पडण्यात येणाऱ्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचं अपडेट आहे. काँग्रेसनं जम्मू काश्मीरच्या निवडणूक प्रचाराकरिता 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. तर निवडणूक आयोगानं हरियाणामधील मतदानाच्या तारखेत बदल केला आहे.

congress 40 star campaigner
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 10:10 AM IST

नवी दिल्ली- हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. निवडणूक आयोगानं हरियाणामध्ये एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख बदलून 5 ऑक्टोबर केली आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं 40 दिग्गज नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून जम्मू काश्मीरमध्ये प्रचाराकरिता उतरविण्याचा निर्णय घेतला.

हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान होणार होते. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेप्रमाणे 1 ऑक्टोबरऐवजी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिश्नोई समाजाच्या सणामुळे निवडणूक आयोगानं हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 8 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. बिश्नोई समाजाचा मताधिकार आणि परंपरांचा आदर करण्यासाठी मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. सणादिवशी मतदान घेतल्यास अनेकांचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ शकतो. हरियाणा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा सहभाग कमी होऊ शकतो, असेही निवडणूक आयोगानं म्हटलं.

  • जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत.
    खासदार रजनी पाटील (Source- ETV Bharat)

सोनिया गांधींसह राहुल गांधींचाही यादीत समावेश-जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी काँग्रेसनं 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या यादीत जयराम रमेश, अंबिका सोनी, अजय माकन, सलमान खुर्शीद आणि कन्हैया कुमार आणि महाराष्ट्रातील रजनी पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचाही स्टार प्रचारकाच्या यादीत समावेश आहे.

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची संपूर्ण यादीमल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, रजनी पाटील, राजीव शुक्ला, मनीष तिवारी, प्रियांका गांधी वाड्रा, इम्रान प्रतापगढी, वेणुगोपाल, किशोरीलाल शर्मा, अजय माकन, रणजित रंजन, अंबिका सोनी, रमण भल्ला, भरतसिंह सोळंकी, ताराचंद, तारिक हमीद, चौधरी लाल सिंग, सुखविंदर सिंग सुखू, पिरजादा मोहम्मद सईद, जयराम रमेश, इम्रान मसूद, गुलाम अहमद मीर, पवन खेडा, सचिन पायलट, सुप्रिया श्रीनेट, मुकेश अग्निहोत्री, कन्हैया कुमार, चरणजित सिंग चन्नी, मनोज यादव, सलमान खुर्शीद, शाहनवाज चौधरी, सुखजिंदर सिंग रंधावा, राजेश लिलोथिया, अमरिंदर सिंग राजा वारिंग, अलका लांबा, सय्यद नासिर हुसेन, श्रीनिवास बी.व्ही, विकार रसूल वाणी आणि नीरज कुंदन

  • जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यात मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनंनॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केल्यानं राजकीय समीकरणे बदलली आहेत.

हेही वाचा-

  1. जम्मू कश्मीरमधील निवडणुका; हिमालयाच्या पायथ्याशी लवकरच लोकशाहीचा उत्सव - Elections in Jammu and Kashmir
  2. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची युती, राहुल गांधी म्हणाले, "काश्मीरला राज्याचा दर्जा..." - Jammu Kashmir Assembly Elections

ABOUT THE AUTHOR

...view details