मुंबई Ranji Trophy Match : रोहित शर्मा लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये सतत संघर्ष करत आहे. गेल्या 15 कसोटी डावांमध्ये त्यानं 10.93 च्या सरासरीनं फक्त 164 धावा केल्या होत्या. बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. यानंतर, तो आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी स्थानिक क्रिकेटकडे वळला. भारतीय कर्णधारानं आज 23 जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरविरुद्ध जवळजवळ 10 वर्षांनी रणजी सामना खेळला. पण त्याचा संघर्ष इथंही सुरुच राहिला. तो फक्त 3 धावा करुन बाद झाला. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियात फलंदाजीचं कौशल्य दाखवणारा यशस्वी जैस्वालही या सामन्यात कामगिरी करु शकला नाही.
- Rohit Sharma goes for 3(19).
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 23, 2025
- Yashasvi Jaiswal goes for 5(8).
- Shubman Gill goes for 4(8).
- NOT A GREAT START FOR TEAM INDIA'S BATTERS IN RANJI TROPHY..!!!! pic.twitter.com/UTd3L28POj
3365 दिवसांनंतर रणजीत सहभाग : आज 23 जानेवारीपासून, अनेक संघांमधील सामने वेगवेगळ्या ठिकाणी खेळले जात आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये एक नाव भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचंही आहे. तो तब्बल 3365 दिवसांनी रणजी ट्रॉफी सामना खेळत आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचं नाव समाविष्ट आहे. रोहितनं या स्पर्धेत शेवटचा सहभाग सुमारे 10 वर्षांपूर्वी 7 नोव्हेंबर 2015 रोजी उत्तर प्रदेशविरुद्ध घेतला होता.
जम्मू आणि काश्मीरविरुद्ध रोहित फ्लॉप : मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, भारताची सलामी जोडी म्हणजेच यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा मुंबईकडून डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले. पण जम्मू आणि काश्मीरच्या गोलंदाजांनी त्यांना खूप त्रास दिला. विशेषतः 6 फूट 4 इंच उंचीच्या उमर नझीरसमोर ते पूर्णपणे असहाय्य दिसत होते. रोहितला त्याचा चेंडू वाचण्यात अडचण येत होती. परिणाम असा झाला की 12 डॉट बॉल टाकल्यानंतर, उमरनं त्याला 13 व्या चेंडूवर बाद केलं.
INDIAN INTERNATIONAL BATTERS IN RANJI TROPHY:
— Johns. (@CricCrazyJohns) January 23, 2025
- Rohit Sharma dismissed for 3 runs.
- Yashasvi Jaiswal dismissed for 4 runs.
- Shubman Gill dismissed for 4 runs. pic.twitter.com/KzHvGd3NWy
यशस्वीही अपयशी : रोहित शर्मासोबत आलेला यशस्वी जैस्वाल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यानं ऑस्ट्रेलियामध्येही आपली ताकद दाखवली आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 43 च्या सरासरीनं 391 धावा केल्या. यात त्यानं 2 अर्धशतकं आणि 1 शतकही झळकावलं. पण जम्मू आणि काश्मीरविरुद्ध त्याची कामगिरीही चांगली नव्हती. तो खूप आत्मविश्वासू दिसत होता आणि त्यानं डावाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकारही मारला. पण या सामन्यात तो 8 चेंडूत 5 धावा करुन बाद झाला.
💔💔#RanjiTrophypic.twitter.com/3Ane9axB7X
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) January 23, 2025
गिलही स्वतात बाद : दुसरीकडे, कर्नाटकविरुद्ध पंजाब संघाची कमान शुभमन गिलकडे सोपवण्यात आली, आणि या सामन्यात गिलनं प्रभसिमरन सिंगसोबत डावाची सुरुवात केली, परंतु गिलचा खराब फॉर्म इथंही कायम राहिला आणि तो 8 चेंडूत 1 चौकारासह 4 धावा काढून बाद झाला. म्हणजेच, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल, हे तिघंही दिग्गज खेळाडू या रणजी हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात फेल ठरले.
Indian Test top 3 in Ranji Trophy:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 23, 2025
Rohit - 3 (19).
Jaiswal - 4 (8).
Gill - 4 (8). pic.twitter.com/w9YqTFVZIS
हेही वाचा :