पुणे : "अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attack Case) खरंच हल्ला झाला, की तो अॅक्टिंग करतोय?", असा संशय भाजपा नेते तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केलाय. बुधवारी (22 जाने.) आळंदीतील हिंदू महोत्सव कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे? : यावेळी बोलत असताना नितेश राणे संशय व्यक्त करत म्हणाले की, "बांगलादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. अगोदर ते फक्त नाक्यावर उभे रहायचे. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित ते सैफ अली खानला घेऊन जायला आले असतील. सैफ अली खान रुग्णालयातून बाहेर असा चालत आला. त्याला बघून मलाच संशय आला, याला खरंच कोणी चाकू मारला की, हा अॅक्टिंग करतोय. तो टुणटुण करत रुग्णालयाच्या बाहेर पडला.”
जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंवर टीका : पुढं नाव न घेता त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर टीका केली. "आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते एकदा बघा. सैफ अली खान, नवाब मलिक (Nawab Malik), शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा यांच्याबाबत काही झालं तरंच बारामतीच्या ताईला पुळका येतो. मात्र, सुशांत सिंह राजपूतबद्दल मुंब्र्याचे जितुद्दिन आणि बारामतीच्या ताई काहीच म्हणत नाही," असा जोरदार हल्लाबोल मंत्री नितेश राणे यांनी यावेळी केला.
हेही वाचा -
- हल्ल्यानंतर रुग्णालयात नेणाऱ्या ऑटो चालकाला सैफ अली खाननं मारली मिठी, फोटो व्हायरल
- सैफ अली खान हल्ला प्रकरण; डावकी नदीत पोहून घुसला भारतात, शरीफुल इस्लामचा कसा झाला 'विजय' ?, जाणून घ्या आरोपीची मोडस ऑपरेंडी
- सैफ अली खान हल्ला प्रकरण: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कसा दिसला नाही शरीफुल इस्लाम, मुंबई पोलिसांच्या डोक्याला झाला ताप, कंट्रोल रुममध्ये...