कोल्हापूर CM Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राज्यात 'हक्क मागतोय महाराष्ट्र' कॅम्पेन राबविण्यात येत आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय. महाराष्ट्रातील जनतेला या लोकांनी इतकी वर्ष झुलवत ठेवलं, ज्यांनी फक्त त्यांच्या मतांचा वापर केला आणि सत्ता भोगली त्यांना असं बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी जळजळीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली, कोल्हापुरात मुख्यमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलत होते.
महायुती बहुमताने विजयी होणार: मुख्यमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षाच्या काळातील कामाचा आलेख मांडताना आमचं काम आणि त्यांचं काम याची तुलना करा, आम्ही केलेल्या योजना, निर्णय याची बरोबरी करा आणि मग बोला, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, त्यांना माहित आहे कुणाचं सरकार सर्व सामान्यांसाठी निर्णय घेते. यामुळंच महायुती आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजयी होणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय.
प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter) महाराष्ट्रातील बहिणी, शेतकरी देणार पोहचपावती : आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी मुंबईत भाषण करताना 2029 ची विधानसभा निवडणूकीत फक्त कमळाचे सरकार येणार असं भाकित केलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या दोन ते अडीच वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कल्याणकारी योजना आणल्या, विकास आणि सर्वसमावेशक योजना यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. याची पोहचपावती महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि भाऊ, शेतकरी आम्हाला देतील, महायुती प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येईल. तर 2024 ला महायुतीचं सरकार येईल, 2029 ला अजून वेळ असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा -
- गेल्या दोन महिन्यात दोन लाख कोटींचे एमओयू साईन-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - EKNATH SHINDE NEWS
- "महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते निराशेत"; खुद्द अमित शाहांचीच कबुली, म्हणाले, स्वबळावर... - BJP Mumbai meeting
- देवेंद्र फडणवीस घाबरलेत; भाजपा 60 जागांच्या पुढे जाऊ शकत नाही, रोहित पवारांची भविष्यवाणी - Rohit Pawar On Devendra Fadnavis