पुणे Sanjay kakade Meet Sharad Pawar : राज्यात दोन ते तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेलं यश पाहता विविध पक्षातील नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत. आज प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली. तर दुसरीकडे भाजपा नेते संजय काकडे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
संजय काकडे यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter) भेटीनंतर संजय काकडे काय म्हणाले :आजच्या बैठकीबाबत संजय काकडे यांना विचारलं असता ते म्हणाले, "माझे मित्र शंकर पवार यांचं वैयक्तिक काम होतं त्यासाठी मी याठिकाणी आलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून या भेटीत वैयक्तिक कामाबाबत चर्चा झाली. माझ्या पक्षातील लोकांना माझावर विश्वास आहे. मला पक्षांनं याबाबत प्रश्न विचारल्यास मी त्यांना उत्तर देईल."
बच्चू कडू कोणत्याही पक्षात जाणार नाहीत :बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली यावर बोलताना संजय काकडे म्हणाले, "बच्चू कडू गेले वीस वर्ष माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी शरद पवारांची भेट घेतलीय. मात्र, ते कोणत्याही पक्षात जाण्याची रिस्क घेणार नाहीत. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. दोन आमदार त्यांचे आहेत. येत्या काळात त्यांच्या पक्षाचे दोन ते तीन आमदार सहज होऊ शकतात."
विधानसभा निवडणुकीबाबत प्रतिक्रिया :आगामी विधानसभा निवडणुकीबाबत संजय काकडे यांना विचारलं असता ते म्हणाले, "आमचा पक्ष भारतातला मोठा पक्ष आहे. भाजपाचे जे आमदार पुण्यात आहेत ते राहतीलच. तसेच ज्यांची निवडून येण्याची पात्रता नसेल तर त्यांची अदलाबदली होऊ शकते. पाच जागा आमच्या आहेत या जागा हलणार नाहीत. कसबा, वडगावशेरी, हडपसर या जागांबाबत फेरविचार होऊ शकतो."
हेही वाचा
- महायुतीचं हेच धोरण, आपलं ठेवायचं झाकून आणि.... - अमोल कोल्हे - Amol Kolhe Criticism Mahayuti
- उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत मनसैनिकांचा राडा; गाडीवर फेकल्या बांगड्या आणि शेण - Thackeray Group VS MNS
- जरांगेंच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरेंचं राजकारण - राज ठाकरे यांचा गंभीर आरोप - Raj Thackeray
- "निकालाच्या दिवशी महाविकास आघाडी फुटणार", आशिष शेलार यांचा दावा - Ashish Shelar On Mahavikas Aghadi