ETV Bharat / politics

"सरकारला झोप कशी येते? माझी सुरक्षा काढा पण..." - सुप्रिया सुळे यांची सरकारला चपराक - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यातील वातावरण तापलं आहे. आज या प्रकरणावरून पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तर सुप्रिया सुळे यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली.

Dhananjay Munde and Supriya Sule
धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2025, 8:05 PM IST

मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या दोन्ही घटना घडल्यापासून तिथले स्थानिक खासदार बजरंग सोनवणे हे त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, त्यामध्ये संदीप क्षीरसागर, रोहित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. हे सर्वजण पाठपुरावा करत आहेत. त्यामुळं आनंदाची बाब ही आहे की, देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून माणुसकीच्या दृष्टिकोनातून सर्वजण एकत्र येत आहेत. न्याय देण्याचं काम सरकारनं करावं. एवढी मोठी घटना घडल्यानंतर या सरकारला झोप कशी येते? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे : "सरपंच देशमुख यांच्या मुलीचे अश्रू बघा, हे प्रकरण संवेदनशील म्हणून सरकारनं हाताळलं पाहिजे. या प्रकरणात राजकारण न आणता माणुसकी म्हणून देशमुख कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. तसंच या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे". असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.

ही आपली नैतिक जबाबदारीच : "मी याच्या आधीही अनेक सरकारं लांबून जवळून पाहिली आहेत. पण हे सरकार आल्यापासून सुरुवातीला तिकिटावरून वाद झाला. त्यानंतर मंत्रिपदावरून वाद, खातेवाटप आणि आता पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. आता वाद आणि पदासाठीच भांडत बसणार का? मग तुम्ही काम कधी करणार? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. तर सरकारमधील काही मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारला नाही. लोकांनी एवढं बहुमत दिलं आहे. त्यानंतर तुम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी असताना सरकारमध्ये कोणीच काम करताना दिसत नाही. केवळ एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करताना दिसत आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली.

ही आपली नैतिक जबाबदारी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येक मंत्र्यांनी यावं अशाप्रकारे सूचना दिल्या होत्या. पण मी म्हणते जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय. मग बैठकीला हजर राहणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपण काय कुणावर उपकार करत नाही. मी खासदार आहे तर मी संसदेत गेलंच पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. पण मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं की, मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर राहावं. हे अतिशय गंभीर असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राजीनाम्याचा सरकार निर्णय घेईल : बीड हत्या प्रकरणावरुन पुण्यात आज आक्रोश मोर्चा निघाला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला असता त्या म्हणाल्या, "मी आता टीव्हीवर बघितलं की, महायुतीतले आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अनेकजण त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. बीड आणि परभणी या दोन्ही घटना अत्यंत गंभीर आहेत. दोन्ही परिवाराच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. सरकारने याच्यामध्ये कुठलंही राजकारणात न आणता माणुसकी आणि संवेदनशीलता बाळगत याचा तपास आणि चौकशी केली पाहिजे. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, याचा निर्णय सरकार घेईल. कारण सरकार सतत आपण संवेदनशील आहोत, असं स्वतःच म्हणत आहे. त्यामुळं निर्णय तेच घेतील. पण आपण त्या दोन्ही कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. याच्या आधीच्या सरकारमध्येही अनेकवेळा काही चुकीचे प्रकार घडले होते. ज्यामुळं मंत्र्यांना नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा लागला होता. परंतु, आता हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळं नैतिक जबाबदारी म्हणून हे सरकार कोणता निर्णय घेणार? हे बघावं लागेल. असंही सुळे म्हणाल्या.

त्यांना फाशी झाली पाहिजे : राज्यात मागील काही दिवसापासून कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे आणि गुन्हेगारी वाढली आहे. अर्थव्यवस्था आणि गुन्हेगारी यांचा एकमेकांशी संबंध आहे. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परभणी आणि बीड प्रकरणांमध्ये सर्वपक्षातील नेत्यांना विश्वासात घेऊन बैठक बोलावली पाहिजे. तसंच याच्यामध्ये कोणतंही राजकारणात न आणता संवेदनशील सरकार म्हणून आणि माणुसकी दाखवून दोषींना फासावर लटकवलं पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

एकवेळ माझी सुरक्षा काढा पण... : पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, "बीड हत्या प्रकरणाचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पाठपुरावा केला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेत काही धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी आपणाला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन आल्याचं म्हटलं. हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा केला पहिजे. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांना सुरक्षा पुरवावी. तसंच सरकारने एकवेळ माझी सुरक्षा काढावी, पण अंजली दमानिया यांना सुरक्षा द्यावी".

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्री आवरा त्यांना…”, मनोज जरांगे पाटील यांचा 'कुणासाठी' इशारा?
  2. छगन भुजबळांबद्दल दोन तीन दिवसांत निर्णय; राऊत, सुळेंकडून आमच्या सरकारवर कौतुकाचा ओघ कायम राहावा - सुनील तटकरे
  3. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा मोठा आरोप; म्हणाले ".... यांनी मला सीआयडी कार्यालयात चुकीची वागणूक दिली"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.