नवी दिल्ली- दिल्ली आणि पंजाबमधील आपचे सरकार पाडण्यात भाजपाला पूर्णत: अपयश आल्याची खोचक टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ते दिल्लीतील आपचे सरकार पाडू शकले नाहीत. ते आपचे आमदार फोडू शकले नाहीत. ते पंजाब सरकारला घालवू शकले नाहीत. त्यांची (भाजपा) संपूर्ण योजना अयशस्वी ठरली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या आमदारांना तुरुगात कशी माहिती मिळत होती, याचं गुपीतदेखील सांगून टाकलं. मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, "तुरुंगातील कर्मचारी आणि सुरक्षकांशी बोलायचो. त्यांनी मला प्रत्येक आमदाराचे अपडेट दिले. मी अनुपस्थित असल्यानं तुमच्या (आमदार) कामात अडथळा येईल, अशी भीती वाटत होती. पण, तुम्ही सर्वांनी उत्तम काम केलं, अशा शब्दात केजरीवाल यांनी आपच्या आमदारांचं कौतुक केलं.
तुमचे अभिनंदन-पुढे ते म्हणाले की, "सुनीता केजरीवाल, दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज, आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे भेटायला येत होते. त्यांच्याकडून दिल्लीतील विविध कामांची माहिती मिळत होती. माझ्या अटकेपूर्वी भाजपाचे नेते मला भेटायचे. माझ्या अटकेनंतर आप पक्ष फोडून , दिल्लीतील सरकार पाडण्यात येणार असल्याचं भाजपाच्या नेत्यांनी अटकेपूर्वी सांगितलं. आपचे आमदार आणि भगवंत मान यांना सर्व प्रकारे भाजपा सोबत घेऊन जाईल, असंही सांगितलं. पण ते घडलं नाही. माझ्या अटकेनंतर, आमचा पक्ष अधिक मजबूत झाला. पक्षाचे सर्व सदस्य एकत्र उभे राहिल्यानं भाजपा आप पक्षाला धक्का देऊ शकले नाहीत. तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि पक्षातून फोडण्याचा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तुम्ही सर्वजण ठाम राहिलात, याबद्दल तुमचे अभिनंदन, असे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आमदारांचं कौतुक केलं.
सर्वांनी पक्षाची काळजी घ्यावी- "2 जूनला पुन्हा तुरुंगात जावे लागेल. तुरुंगात परत गेल्यावर सर्वांनी पक्षाची काळजी घ्यावी," असा सल्ला अरविंद केजरीवाल यांनी दिला. कथित मद्यधोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात होते. सर्वोच्च न्यायालयानं 1 जूनपर्यंत त्यांना ४० दिवसानंतर अंतरिम जामीन मंजूर केला. जामिन काळात त्यांना प्रचाराची परवानगीदेखील देण्यात आली.
गॅरंटीची अंमलबजावणी होईल-मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीकरिता केजरीवाल यांच्या दहा हमी (गॅरंटी) जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, " माझ्या अटकेमुळे दहा गॅरंटी जाहीर करण्यास उशीर झाला. पण निवडणुकीचे बरेच टप्पे अद्याप बाकी आहेत. मी बाकीच्यांशी चर्चा केलेली नाही. इंडिया आघाडीकडून त्यासाठी काही अडचण येणार नाही. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर या गॅरंटीची अंमलबजावणी होईल, याचे मी वचन देतो.
- पहिली हमी-देशात २४ तास वीज देणार आहोत. देशात ३ लाख मेगावॅट वीज निर्माण करण्याची क्षमता आहे. पण वापर फक्त २ लाख मेगावॅट आहे. आपला देश वीज उत्पादन करू शकतो. मागणीपेक्षा जास्त वीज आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये उपलब्ध करून देणार आहोत.
- दुसरी हमी-देशातील सरकारी रुग्णालयाची स्थिती चांगली नाही. तिसरी हमी नागरिकांकरिता उत्तम आरोग्यसेवा आहे. आम्ही प्रत्येकासाठी चांगल्या उपचारांची व्यवस्था करून देणार आहोत. प्रत्येक गावात आणि प्रत्येक परिसरात मोहल्ला दवाखाने उघडले जातील. या देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासाठी आरोग्य सेवेवर पैसे खर्च करणार आहोत.
- तिसरी हमी- सर्वांसाठी उत्तम आणि उत्कृष्ट मोफत शिक्षणाची व्यवस्था करणार आहोत. त्यामुळे सरकारी शाळा खाजगी शाळांपेक्षा चांगले शिक्षण देतील. दिल्ली आणि पंजाबमध्ये 5 लाख कोटी रुपये लागणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून 2.5 लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत.सत्तेत आल्यास देशातील सर्व गरिबांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घोषणा केली.
- चौथी हमी-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालम्हणाले, "आमची चौथी हमी 'नेशन फर्स्ट' आहे. चीननं आमची जमीन बळकावली. पण आमचे केंद्र सरकार ते नाकारत आहे. आमच्या सैन्यात प्रचंड ताकद आहे. चीनच्या ताब्यातील देशाची सर्व जागा मोकळी करून दिली जाईल. त्यासाठी मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न केले जातील. सैन्यदलाला यासंदर्भात वाट्टेल ते पाऊल उचलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल. अग्निवीरसारखी योजना असून त्यामुळे सैन्यदल आणि तरुणही त्रस्त आहेत. ही अग्निवीर योजना मागे घेतली जाईल.
हेही वाचा-
- अरविंद केजरीवाल यांच्या जामीनामुळं महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांमध्ये उत्साह; मुंबईत होणार सभा - Lok Sabha Election 2024
- अरविंद केजरीवालांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका; म्हणाले 'भाजपाला लोकशाही संपवायची' - Arvind KeJriwal Press Conference
- तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवाल आक्रमक; म्हणाले, "देशाला हुकूमशाहीपासून..." - Interim Bail To Arvind Kejriwal