महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

पंतप्रधान नरेंद्र मोदी ते सैन्यदलातील अधिकारी, पहा देशभरातील आंतरराष्ट्रीय योगदिनाचे फोटो - International Yoga Day 2024

भारताने जगाला योगचे महत्त्व पटवून दिले. आज देशात १० वा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होत आहे. योगदिनाचा उत्साह तामिळनाडू ते जम्मूपर्यंत दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील योगदिनात सहभाग घेत योगदिनाचं महत्त्व सांगितलं. तर अत्यंत उंच पर्वत तर कधी वाळवंट अशा ठिकाणी योगासने करत भारतीय जवानांनी आरोग्याचा संदेश दिला. (Source-IANS)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 11:42 AM IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते रवी शंकर प्रसाद हे योगदिनानिमित्त कपालभाती करताना दिसून आले. (Source- IANS)
योगदिनात लहान मुलांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला. (Source- IANS)
सीमा सुरक्षा दलाचे जवान जेसीपी अटारी, अमृतसर येथे शून्य रेषेवर योगा करताना दिसून आले. (Source-ANI)
त्सुकीजी होंगवानजी मंदिरात जपानमधील भारतीय दूतावासाकडून योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी जपानमधील भारतीय दुतावासाचे अधिकारी उपस्थित होते. (Source-ANI)
दिल्लीत नागरिकांनी योगदिनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. (Source- IANS)
केंद्रीय आरोग आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा हे योग करताना दिसत आहेत. (Source- IANS)
टाइम्स स्क्वेअर येथे योग कार्यक्रमात विदेशातील नागरिकांसह भारतीयांनी सहभाग घेत उत्साह दाखवला. (Source-ANI)
आयटीबीपीच्या जवानांनी 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर योगासने केली. (Source-ANI/Army)
श्रीनगरमध्ये योगदिनातील सहभागानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थित असलेल्या नागरिकांसोबत सेल्फी काढला. (Source- IANS)
संरक्षण दलातील जवानांनी योगदिनात सहभाग घेऊन आरोग्य जपण्याचा नागरिकांना एकप्रकारे संदेश दिला. (Source-ANI/Army)
उगवत्या सुर्याबरोबर सैन्यदलाचे जवान योगासने करताना पाहून त्यांचा उत्साह दिसून येतोय. (Source-ANI/Army)
शिस्त आणि जिद्दीसाठी परिचीत असलेल्या सैन्यदलाच्या जवानांनी सकाळी योगसत्रात भाग घेतला. (Source-ANI/Army)
सोनिया विहार वॉटर स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांनी पाण्यात चित्तथरारक योगासने केली. (Source-IANS)
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भुजंगासन तर लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला यांनी भ्रामरी प्राणायम केला. (Source-IANS)
ताजमहालचे सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आग्रा येथील दसरा घाटावर योगासने केली. (Source-ANI)
सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी वाळवंटात योगासने केली. (Source-ANI/Army)
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशभरात उत्साह दिसून आला. योगदिनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, संरक्षण दलातील जवान यांच्यासह देशभरातील लाखो नागरिकांनी योगदिनात सहभाग घेत योगासने केली. (Source-IANS)

ABOUT THE AUTHOR

...view details