ETV Bharat / entertainment

धनुषनं कॉपीराइट केस जिंकली, नयनताराला बसला धक्का, अभिनेत्याविरुद्ध नेटफ्लिक्सची याचिका रद्द - DHANUSH NAYANTHARA CONTROVERSY

धनुष आणि नयनतारा कॉपीराइट प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयानं आता निकाल सुनवला आहे.

dhanush and nayanthara
धनुष आणि नयनतारा (धनुष-नयनतारा (ETV Bharat/ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 28, 2025, 5:16 PM IST

मुंबई : साऊथ सुपरस्टार धनुष आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यातील कॉपीराइट प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयानं नेटफ्लिक्स इंडियाची याचिका फेटाळून लावली आहे. हे प्रकरण नयनताराच्या 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' या माहितीपटाशी संबंधित आहे. धनुषच्या चित्रपटातील 3 सेकंदाची क्लिप घेतल्यामुळे नयनतारा आता कायदेशीर अडचणीत सापडली आहे. न्यायालयानं धनुषच्या बाजूनं निकाल दिला आहे. नेटफ्लिक्स इंडियानं धनुषचा नयनतारा विरुद्धचा कॉपीराइट खटला रद्द करण्याची मागणी केली होती. आता मद्रास उच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली आहे.

धनुष आणि नयनताराचा वाद : धनुषनं यापूर्वी नयनताराला इशारा दिला होता की, जर तिनं 'नानुम राउडी धान' या चित्रपटामधील 3 सेकंदांची क्लिप तिच्या माहितीपटातून काढून टाकली नाही तर, तो तिच्यावर कायदेशीर कारवाई करेल. आता न्यायाधीशांनी गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सनं दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय कोणतीही तारीख न देता पुढे ढकलला आहे. या प्रकरणी न्यायाधीश अब्दुल कुद्दुस यांनी असा निर्णय दिला की, ज्याच्याबद्दल हा माहितीपट बनला आहे, त्याचा 'नानुम राउडी धान'मधील 3 सेकंदाच्या क्लिपवर काहीही अधिकार नाही. धनुष आणि त्याच्या प्रोडक्शन हाउस वंडरबारनं नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता.

नयनताराची अडचण वाढली : आता न्यायलयानं याप्रकरणी नयनताराकडून उत्तर मागितलं आहे. नयनतारानं धनुषकडे चित्रपटाची क्लिप वापरण्याची परवानगी मागितली होती, जी तिला मिळाली नाही. त्यानंतर तिनं चित्रपटाच्या क्लिपऐवजी बीटीएस फुटेज वापरले होते. यावर देखील कारवाई धनुषनं केली. त्यानं नयनताराला कायदेशीर नोटीस पाठवून 10 कोटी रुपयांची मागणी केली. 'नानुम राउडी धान' हा चित्रपट विघ्नेश शिवन यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती धनुषच्या प्रोडक्शन हाउस वंडरबारनं केली आहे. विजय सेतुपती आणि नयनतारा अभिनीत हा चित्रपट 2015 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विघ्नेश शिवन आणि नयनतारा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचं लग्न 2022 मध्ये झालंय. यानंतर, नयनताराच्या जीवनावरील 'नयनतारा बियॉन्ड द फेयरी टेल' माहितीपट निर्मित करण्यात आला. हा माहितीपट गेल्या वर्षी नेटफ्लिक्सच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला गेला होता.

हेही वाचा :

  1. नयनतारानं धनुषबरोबरच्या सुरू असलेल्या वादाबद्दल दिलं स्पष्टीकरण, निषेध पत्राबद्दल म्हटलं...
  2. कॉपीराईट प्रकरणी नयनताराविरोधात धनुषची कोर्टात धाव, आता अभिनेत्रीला द्यावं लागणार उत्तर
  3. धनुष-ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घटस्फोट प्रकरणाचा अंतिम निर्णय 'या' दिवशी होईल, जाणून घ्या तारीख...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.