ETV Bharat / state

राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना - ARTIFICIAL INTELLIGENCE UNIVERSITY

महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार असून, यासाठी समिती गठीत करावी, अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यात.

Higher and Technical Education Minister Chandrakant Patil
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 6:24 PM IST

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून देशभरात आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एआयच्या माध्यमातून अनेक अशक्य गोष्टीही साध्य करता येत आहेत. विशेष म्हणजे विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वीरीत्या पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही एआयची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार असून, यासाठी समिती गठीत करावी, अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यात.

जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवणारे ज्ञान मिळणार - उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्यात. अत्याधुनिक संशोधन, उद्योग आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळवून जागतिक स्पर्धेत टिकवून ठेवणारे ज्ञान उपलब्ध होईल असे विद्यापीठ असावे, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार - मंत्रालयात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. या बैठकीला उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव, बी. वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, उपसचिव अशोक मांडे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, तसेच राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री आशिष शेलार म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या एआय विद्यापीठाची स्थापना होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने संबंधित क्षेत्रांवर प्रभाव टाकल्यास रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याला अधिक गती देण्यासाठी एक विशेष कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव, बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, परेश पागे यांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी
  2. "पहाटेचा शपथविधी ते बीड प्रकरण"; शिर्डीतील शिबिरात धनंजय मुंडेंचा रोष कोणाकडं?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.