महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ब्राझीलमध्ये प्रवासी विमान कोसळलं; 61 जणांचा मृत्यू, पाहा थरारक व्हिडिओ - Brazil Plane Crash - BRAZIL PLANE CRASH

Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये शुक्रवारी मोठी विमान दुर्घटना (Brazil plane crash) घडली आहे. ब्राझीलच्या साओ पाउलो राज्यात (Sao Paulo Plane Crash) एक प्रवासी विमान गेट्ड या रहिवासी भागात कोसळलं, या दुर्घटनेत 61 लोक ठार झाल्याची माहिती अधिकारी आणि एअरलाइन्सनं दिली.

Plane Crash In Brazil
ब्राझीलमध्ये विमान दुर्घटना (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 6:55 AM IST

Updated : Aug 10, 2024, 8:16 AM IST

ब्राझील Brazil Plane Crash : ब्राझील येथे प्रवासी विमान (Brazil plane crash) कोसळलं. 61 प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान शुक्रवारी विन्हेडो प्रांतात कोसळलं असल्याचं (Sao Paulo Plane Crash) वृत्त स्थानिक वृत्तवाहिनीनं दिलं आहे. 'व्होपास लिन्हास एरिआज' कंपनीचं 'एटीआर-72' हे विमान पराना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसला जात होतं. शुक्रवारी (9 ऑगस्ट) दुपारी पावणे दोनच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ही दुर्घटना घडली.

विमान कंपनीनं जारी केलं निवेदन : दरम्यान, एअरलाईन्स कंपनी 'व्होपास'नं एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी विमान अपघाताच्या वृत्ताची पुष्टी केली. त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की, साओ पाऊलो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ग्वारूलहोसला जाणारं एक विमान कोसळलं. या विमानात एकूण 57 प्रवासी होते. तसेच पायलटसह चार कर्मचारी देखील होते. विमान कंपनीनं निवेदन जारी केलं असलं तरी ही विमान दुर्घटना कशामुळं झाली ते अद्याप स्पष्ट झालं नाही.

विमान कोसळतानाचे व्हिडिओ आले समोर : विमानातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यानंतर विमानाचा विमानतळाशी संपर्क तुटला. त्यानंतर काही वेळातच हे विमान थेट खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विमान नेमकं कशामुळं कोसळलं? विमानात आग कशामुळं लागली? हे अद्याप समजू शकलं नाही. विमान कोसळल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या व्हिडिओंची खातरजमा ईटीव्ही भारत करत नाही.

धावपट्टीवरून घसरल्यानं कोसळलं विमान : या आधीही 24 जुलै रोजी अशीच एक घटना घडली होती. काठमांडू विमानतळावरून उड्डाण करताना विमान धावपट्टीवरून घसरल्यानं ते कोसळलं होतं. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला होता. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, विमान काठमांडूहून पोखराकडं रवाना होणार होतं. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील माहिती अधिकारी ज्ञानेंद्र भुल यांनी ही माहिती दिली होती. विमान उड्डाणावेळी त्यात फक्त तांत्रिक कर्मचारीच होते.

हेही वाचा -

  1. नेपाळमध्ये उड्डाण करताना विमान कोसळले! वैमानिक वगळता सर्वांचा मृत्यू - Kathmandu plane crash
  2. मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांच्यासह 9 जणाचा विमान अपघातात मृत्यू - Saulos Chilima dies in plane crash
  3. अफगाणिस्तानात भारताचं विमान कोसळल्याचा तालिबानचा दावा, डीजीसीएनं दिली महत्त्वाची माहिती
Last Updated : Aug 10, 2024, 8:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details