महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

रिया कपूरनं 'क्रू' सेटवरचा करीना आणि क्रितीचा पिझ्झा पार्टीचा व्हिडिओ केला शेअर, पाहा व्हिडिओ - Kareena Kapoor And Kriti Sanon - KAREENA KAPOOR AND KRITI SANON

Kareena Kapoor And Kriti Sanon : अनिल कपूरची मुलगी रिया कपूरनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि क्रिती सेनॉन पिझ्झा खाताना दिसत आहेत.

Kareena Kapoor And Kriti Sanon
करीना कपूर आणि क्रिती सेनॉन

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 5:18 PM IST

मुंबई - Kareena Kapoor Kriti Sanon : अभिनेत्री करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनॉन स्टारर 'क्रू' हा मोस्ट अवेटेड चित्रपट 29 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित दाखल होणार आहे. या स्टारकास्टबरोबर निर्मातेही या चित्रपटाच्या रिलीजबाबत उत्सुक आहेत. रिलीजपूर्वी, अलीकडेच फिल्म मेकर- रिया कपूरनं सोशल मीडियावर करीना आणि क्रितीचा एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये करीना आणि क्रिती या दोघेही पिझ्झा पार्टी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना रियानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''सगळे म्हणतात की अभिनेत्री कधीच पिझ्झा खात नाहीत. बेबो उर्फ करीना कपूर खान आणि क्रिती सॅनॉनबरोबर पिझ्झा पार्टी.''

करीना आणि क्रितीचा व्हिडिओ व्हायरल :'क्रू'मध्ये करीना, क्रिती आणि तब्बू एअर होस्टेसच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात कंपनीच्या दिवाळखोरीमुळे करीना, क्रिती आणि तब्बू यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यानंतर त्यांना मृत प्रवाशाच्या अंगावर बरेच सोने आढळते. या तिघेचेही आयुष्य बदलून जाते. हा चित्रपट खूप कॉमेडी असणार आहे, असं या चित्रपच्या ट्रेलरवरून समजून येत आहे. या चित्रपटामध्ये दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा हे देखील कलाकार असणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट आणखीचं मनोरंजक असेल. आता अनेकजण या चित्रपटाची खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत.

करीना कपूर खानचे आगामी चित्रपट :राजेश कृष्णन दिग्दर्शित 'क्रू' या चित्रपटाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्स आणि अनिल कपूर फिल्म्स अँड कम्युनिकेशन नेटवर्क, एकता कपूर, रिया कपूर, आणि दिग्विजय पुरोहित यांनी केली आहे. दरम्यान करीना पती सैफ अली खान आणि मुले तैमूर अली खान आणि जहांगीर अली खानसह टांझानियामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिनं सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. करिनानं शेअर केले फोटो अनेकांना आवडत आहेत. तसेच करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तरपुढं ती 'वीरे दी वेडिंग 2' , 'सिंघम अगेन' आणि 'तख्त' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. होळीच्या दिवशीच मोबाईलनं केला घात; स्फोटात चार चिमुकल्यांचा मृत्यू, आई-वडील गंभीर - 4 children died due to Mobile blast
  2. देवोलिना भट्टाचार्जी स्टारर 'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज , पाहा व्हिडिओ - Bengal 1947 An Untold Love Story
  3. सापाच्या विषाची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर एल्विश यादवनं शेअर केली पहिली पोस्ट - Elvish Yadav post

ABOUT THE AUTHOR

...view details