मुंबई - Viduthalai Part 2 First Look :साऊथ चित्रपटांचा दमदार अभिनेता विजय सेतुपती सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महाराजा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'महाराजा' या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची अनेकजण कौतुक करत आहेत. दरम्यान, हा अभिनेता क्राईम थ्रिलर चित्रपट विदुथलाई (2023) च्या सीक्वेलमुळे देखील चर्चेत आहे. नुकतेच या 'विदुथलाई पार्ट 2'बद्दल एक अपडेट समोर आली आहे. आज 17 जुलै रोजी 'विदुथलाई पार्ट 2' या चित्रपटातील विजय सेतुपती आणि मंजू वारियर यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'विदुथलाई पार्ट 2'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचं दोन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
विजय सेतुपती आणि मंजू वॉरियरचा 'विदुथलाई पार्ट 2'चा फर्स्ट लुक रिलीज - vijay sethupathi New movie - VIJAY SETHUPATHI NEW MOVIE
Viduthalai Part 2 First Look : विजय सेतुपती आणि मंजू वारियर अभिनीत 'विदुथलाई पार्ट 2'मधील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यानं सोशल मीडियावर दोन पोस्टर्स शेअर केले आहेत.
Published : Jul 17, 2024, 1:28 PM IST
'विदुथलाई पार्ट 2'मधील विजयचा फर्स्ट लूक रिलीज: वेत्रिमारन दिग्दर्शित 'विदुथलाई पार्ट 2' या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. रिलीज झालेल्या दोन चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मुख्य स्टारकास्टची एक झलक दिसत आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये विजय सेतुपतीचा उग्र अवतार पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये विजयच्या हातात शस्त्र असून तो ओरडताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये विजय सेतुपती आणि मंजू वारियर हे दोघेही दिसत आहे. या चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी यावर लिहिलं आहे की, "चित्रपटाच्या अंतिम टप्प्यावर तुमच्यासाठी ही भेट आहे." दरम्यान हा चित्रपट अंतिम टप्प्यात आला आहे. आरएस इन्फोटेनमेंट, ऑलरेड कुमार, रेड जायंट मुव्हीज, ए ग्रासरूट्स फिल्म कंपनी प्रॉडक्शन प्रस्तुत, या चित्रपटाला संगीत इलैयाराजा यांनी दिलंय.
'विदुथलाई' चित्रपटाबद्दल : या चित्रपटात अभिनेता सुरी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय विजय हा मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहे. तर उर्वरित स्टारकास्टमध्ये सूर्या सेतुपती, भवानी श्रेय, राजीव मेनन, तमिझ आणि गौतम वासुदेव महत्त्वाच्या भूमिकेत असेल. दरम्यान 'विदुथलाई'बद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट 31 मार्च 2023 रोजी रिलीज झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार 40 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या 'विदुथलाई' या चित्रपटानं जगभरात 55 कोटी आणि भारतात 46.9 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.