मुंबई - 'To Kill a Tiger' in Oscars 2024:'टू किल अ टायगर' या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे. 96 व्या अकादमी पुरस्कार (ऑस्करसाठी) नामांकन मिळाल्यानं आता अनेकजण खूश आहेत. 'टू किल अ टायगर' या चित्रपटाशिवाय 'बॉबी वाईन: द पीपल्स प्रेसिडेंट', ‘द इटरनल मेमरी’, 'फोर डॉटर्स', '20 डेज इन मारियुपोल' या चित्रपटांनाही या श्रेणीत नामांकण मिळालं आहे. 'टू किल अ टायगर' या चित्रपटाचं दिग्दर्शन निशा पाहुजानं केलंय. ही डॉक्युमेंटरी सामूहिक बलात्काराच्या वेदनादायक घटनेवर आधारित आहे. या घटनेनंतर न्याय मिळवण्यासाठी किती कठीण आव्हान पालकांसमोर येतं हे भयाण वास्तव या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे.
'टू किल अ टायगर'ची ऑस्करमध्ये एंट्री :'टू किल अ टायगर' चित्रपटामध्ये एका सामान्य व्यक्तीचा भावनिक प्रवास दाखविण्यात आला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं जबरदस्त कमाई केली आहे. 'टू किल अ टायगर'मध्ये झारखंडमधील 13 वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार होतो. समाजातील एक आव्हानात्मक विषय दाखविल्याबद्दल आता या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होतंय. उत्तर अमेरिकेत या चित्रपटाला चांगलाच पाठिंबा मिळतोय. ऑस्करसाठी नामांकन मिळाल्यानंतर या डॉक्युमेंटरीवर भाष्य करताना टीफ्फी ज्युरीनं म्हटलं, ''प्रेमावर चित्रपट बनवणं सोपं नाही. निशा पाहुजाच्या 'टू किल अ टायगर'मध्ये एक वडील आपल्या मुलीचे रक्षण करत आहेत. ते दोघे मिळून गाव, देश आणि कदाचित जग बदलण्याचे काम करत आहेत.''