हैदराबाद - यंदाचं 2024 वर्ष समाप्तीच्या दिशेनं जात असताना रामोजी फिल्म सिटी 31 डिसेंबर रोजी वर्षाची सांगता संस्मरणीय बनवण्याची तयारी करत आहे. 2025 या नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्याची संधी यानिमित्तानं उपलब्ध होणार आहे. या रंगारंग संध्याकाळचं वैशिष्ठ्य म्हणजे भारताचा येक नंबरचा डीजे चेतस याचा लाईव्ह परफॉर्मन्स सादर होणार आहे. तो त्याच्या चमकदार बीट्सवर तमाम उपस्थितांच्या गर्दीला ताल धरायला लावणार आहे.
रंगतदार मनोरंजनाचा तडका
डीजे चेतसचा हा लाईव्ह परफॉर्मन्स शो मनोरंजनानं पुरेपूर हमी देणारा आहे. यामध्ये डीजे चेतससह उपस्थित पाहुणे वेलकम डान्स, बॉलिवूड डान्स परफॉर्मन्स, फन गेम्स आणि स्टँडअप कॉमेडीचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय इंटरनॅशनल फायर परफॉर्मन्स, जंगल थीम असलेलं एक्रोबॅटिक स्टंट्स, क्लोन शो, लायन किंग परफॉर्मन्स आणि स्क्विड गेम्सचा रंगतदार मनोरंजनाचा तडका या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणार आहे.
तुमच्या पसंतीचं पॅकेज निवडा
या उत्सवी सोहळ्याला 31 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता सुरूवात होईल. उपस्थित पाहुणे त्यांच्या पसंतीनुसार पॅकेजेसच्या श्रेणी निवडू शकतात. पर्यायांमध्ये प्रीमियम टेबल्स, जोडप्यांसाठी खास आसनव्यवस्था, व्हीआयपी पॅकेजेस आणि बजेट-फ्रेंडली फॅन पिट पॅकेजेसचा समावेश आहे. या पॅकेजीसच्या किंमती 2000 रुपयांपासून सुरू होतात.
Get ready for the Chetas countdown! 😉
— RAMOJI FILM CITY (@Ramoji_FilmCity) December 20, 2024
Bring in 2025 with India’s No.1 DJ – DJ Chetas at the BIGGEST NYE bash only at Ramoji Film City! 🪩 ✨
.
.
🗓️ 31/12/24
🕰️ Entry 7 PM
.
To have an unforgettable night, click https://t.co/TPYVsGAMts
Or
Call us at 76598-76598#ramojifilmcity pic.twitter.com/H3rN8LJv9n
अर्ली बर्ड ऑफर
ज्या प्रेक्षकांना लवकर बुकिंग करायचे आहे त्यांच्यासाठी खास 'अर्ली बर्ड ऑफर' उपलब्ध आहे. कोणीही आता त्यांचं पॅकेज निवडू शकतं आणि अविस्मरणीय अशा नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या पार्टी सोहळ्यासाठी त्यांचं स्थान सुरक्षित करू शकतं.
वाहतूक सुविधा
पार्टीनंतर सुरळीत परत जाण्यासाठी एलबी नगर मेट्रो स्टेशनपर्यंत सामायिक वाहतूक उपलब्ध असणार आहे. यामुळं अतिथींना कोणत्याही त्रासाशिवाय घरी परत जाणं सोपं होईल. बुकिंगसाठी तुम्ही www.ramojifilmcity.com या साइटला भेट देऊ शखता किंवा 76598 76598 वर कॉल करु शकता.
Let the beats of DJ Chetas do the talking! 🔥🪩🤘🏼
— RAMOJI FILM CITY (@Ramoji_FilmCity) December 17, 2024
.
.
To bring in 2025 with us, click https://t.co/TPYVsGBkj0
Or
Call us at 76598 76598 to secure your spot!
🗓 31/12/2024
⏰ Entry 7 PM
.
.#ramojifilmcity #djchetas pic.twitter.com/wsG74H2pJY
रामोजी फिल्म सिटी बद्दल
चित्रपट निर्मात्याचं नंदनवन असलेली आणि हॉलिडेमेकरसाठी स्वप्नवत ठिकाण असलेली रामोजी फिल्मसिटी ही जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. भारतातील हे एक अद्वितीय थीमॅटिक पर्यटन स्थळ आहे. 2000 एकर पेक्षा जास्त पसरलेल्या जागेत ही फिल्मसिटी उभी आहे. चित्रपट निर्माते आणि चित्रपटाची आवड असलेल्या पर्यटकांसाठीचे हे सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. प्रत्येक वर्षी सुमारे 200 चित्रपट युनिट्स रामोजी फिल्मसिटीमध्ये त्यांचं सिनेमॅटिक व्हिजन साकारतात. आतापर्यंत या ठिकाणी 2500 हून अधिक चित्रपट विविध भारतीय भाषांमध्ये शूट झाले आहेत.