ETV Bharat / state

सतीश वाघ यांच्या पत्नीनेच दिली त्यांच्या खुनाची सुपारी, कबुली दिल्यानंतर पोलिसांनी केली अटक - SATISH WAGH MURDER CASE

सतीश वाघ खून प्रकरणी छडा लावण्यास पोलिसांना यश आल्याचं दिसतय. या प्रकरणी आज त्यांच्या पत्नीलाच अटक करण्यात आली.

सतीश वाघ
सतीश वाघ (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2024, 10:55 PM IST

पुणे : सतीश वाघ खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या खुनाची सुपारी दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता.

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सापडला सतीश वाघ यांचा मृतदेह होता. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाइंड असल्याचा समोर आलय. भाजपाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर सतीश वाघ यांचे मामा होते.

या प्रकरणी पोलीस स्टेशन हडपसर गु. र. नं 1848/ 2024 भा. न्या. कलम 103(1), 140(1) ,140(2), 140(3), 61(2), 238, 3(5) गुन्ह्यामध्ये महिला आरोपी मोहिनी सतीश वाघ, वय 48, रा. ब्लूबेरी हॉटेल जवळ, फुरसुंगी फाटा, फुरसुंगी, पुणे यांचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. या गुन्ह्यातील कटात त्यांचा सहभाग निश्चित झालं आहे. तसंच चौकशी दरम्यान महिला आरोपीनं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आज दि. 25/12/2024 रोजी साडे सात वाजता त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. यासंदर्भात अधिक माहिती वेळोवेळी कळविण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांनी निर्घृण खून केल्यानंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेनं पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे यांना ताब्यात घेतलं. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुण्यातील फुरसुंगी येथील सोलापूर रस्त्यावरील हॉटेल ब्लु बेरी समोर सतीश वाघ हे थांबले होते. यावेळी त्यांना जबरदस्तीनं चारचाकी गाडीत घालून त्यांचं अपहरण करण्यात आलं. या प्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलानं तत्काळ हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याचा तपास सुरू असतानाच यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला होता. आता या खुनाची उकल झाली आहे.

हेही वाचा..

  1. सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये; आमदार योगेश टिळेकरांचं विधान
  2. भाजपा आमदाराच्या मामाची हत्या; गुन्हे शाखेनं दोन संशयितांना ठोकल्या बेड्या, खुनाचा होणार उलगडा ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.